आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युतीचे २५ वर्षांतील काम दाखवा आणि बक्षीस मिळवा! राधाकृष्ण विखे पाटील यांचे आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्या अडीच दशकांपासून सत्तेत असलेल्या शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीने शहरात एकही काम केले नाही, तरीही ते विकासाच्या गप्पा मारत असतील तर त्यांनी केलेले काम दाखवा अन् बक्षीस मिळवा, अशी घोषणा करण्याची वेळ आली असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

समांतर जलवाहिनी या प्रकल्पात आपल्याला समांतर वाटा मिळावा यासाठी सेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी सर्व नातेवाईकच निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असल्याचा आरोपही त्यांनी केला. गुरुवारी विखे पाटील यांनी शहरात दोन सभा घेतल्या. त्याआधी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी युतीच्या कारभाराचे वाभाडे काढले. खासदार खैरे यांनी मुलगा पुतण्याला उमेदवारी दिली असून हा सर्व खटाटोप समांतर पाणीपुरवठा योजनेतील टेंडर प्रक्रियेत समांतर वाटा मिळवण्यासाठी असल्याचेही ते म्हणाले. शहरातील सर्व मोठ्या योजना या राज्य केंद्र सरकारनेच दिल्या असून त्यात काँग्रेसचीच भूमिका असल्याचे ते म्हणाले. मात्र, प्रत्येक योजना मुंबई दिल्लीतून मीच आणली, असे खैरे सर्वांना सांगत फिरतात. प्रत्यक्षात यात त्यांचा वाटा काहीही नसल्याचे विखे पाटील म्हणाले. गेल्या पाच वर्षांपूर्वीच केंद्र राज्याने पालिकेला समांतर जलवाहिनीसाठी निधी उपलब्ध करून दिला; मात्र युतीचे प्रशासक त्यावरील व्याज मिळवण्यातच धन्यता मानतात, या प्रकल्पाच्या कामात पारदर्शकता त्यांनी ठेवली नाही, असाही आरोप त्यांनी केला. शासनाने दिलेल्या निधीतून बीड बायपास झाला, परंतु पालिकेने तेथे मंगल कार्यालयांना मोठ्या प्रमाणावर मंजुरी दिली, परंतु पार्किंगची जागा सोडली नाही, त्यामुळे या रस्त्यावर जागोजागी वाहनेच उभी दिसतात, यामागे कोण आहे, याचाही मतदारांनी विचार करावा, असेही ते म्हणाले. या वेळी आरेफ नसीम खान, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, आमदार सुभाष झांबड, एम. एम. शेख, सचिन सावंत, सय्यद अक्रम, कदीर मौलाना उपस्थित होते.

एमआयएमलाच फटका बसेल
विधानसभानिवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मते घेणाऱ्या एमआयएम या पक्षालाच या निवडणुकीत फटका बसेल, असा दावाही विखे पाटील नसीम खान यांनी केला. वांद्रा विधानसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आला असून या वेळी आम्ही सत्तेपर्यंत पोहोचू, असा दावाही या नेत्यांनी केला आहे. आमची लढाई ही युतीशीच आहे, एमआयएम म्हणजे अपक्षांचे म्होरके असल्याचेही ते म्हणाले.

रोशनगेट येथील सभेत मार्गदर्शन करताना विखे पाटील. छाया : मनोज पराती