आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकारांनी प्रश्‍न विचारताच राधे माँने केला ड्रामा , बेशुद्ध होऊन कोसळली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राधे मॉं खाली कोसळताना तिला उचलताना भाविक. - Divya Marathi
राधे मॉं खाली कोसळताना तिला उचलताना भाविक.
औरंगाबाद- एका महिलेच्या छळ प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने चर्चेत आलेल्या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधेमाँ यांची औरंगाबादच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी दोन तास कसून चौकशी केली. राधेमाँ मिटमिट्यातील आलिशान मेडोज रिसॉर्टमध्ये मुक्कामाला असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर गुन्हे शाखेचे पथक तेथे धडकले. मात्र, मुंबईतून कोणतीही सूचना नसल्याने त्यांना अटक केली नसल्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले. दरम्‍यान, शुक्रवारी रात्री पत्रकारांनी प्रश्‍न विचारण्‍यासाठी गाठले असता त्‍यांनी खाली कोसळून बेशुद्ध होण्‍याचे नाटक केले.
नांदेडच्या गुरुद्वारात दर्शनासाठी जाण्याकरिता त्यांनी मेडोजमध्ये भक्तांसह मुक्काम ठोकला आहे. राधेमाँचा चित्रविचित्र कपडे परिधान करून डान्स करणारा एक फोटो नुकताच व्हायरल झाला आहे. राधेमां आणि त्यांच्या एका भक्ताच्या आक्षेपार्ह संभाषणाची ऑडिओ टेपही चैनेल्सवरून प्रसारित होत आहे. बोरिवलीतील मिठाई व्यावसायिक गुप्ता यांची सून निक्की गुप्ताने राधेमांच्या इशाऱ्यावरून आपला हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ होत असल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. पोलिसांकडून अटकेची कारवाई होण्याच्या भितीने राधेमां मुंबईतून पलायन करण्याची शक्यताही वर्तवली जात होती. आणि त्या औरंगाबादेत भक्तांसह (सहा महिला, सात पुरुष) आल्याची माहिती उघड झाली.
त्या मेडोज रिसोर्टमध्ये असल्याचे कळताच प्रसारमाध्यमांनी तेथे गर्दी केली. तोपर्यंत गुन्हे शाखेचे पथकही तेथे दाखल झाले होते. बंद खोलीत त्यांनी राधेमांची दोन तास कसून चौकशी केली. त्यात त्यांनी कोणते प्रश्न विचारले आणि त्यावर काय उत्तरे मिळाली, याचा तपशील मिळू शकला नाही.

लूकआऊट नोटीस टळली
गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या राधे माँविरोधात लूक आऊट नोटीस काढण्याचा मुंबई पोलिस विचार करत होते, मात्र आता शुक्रवारी त्या औरंगाबादेत असल्याची माहिती मिळाल्याने ही नोटीस काढली जाणार नाही. मात्र राधे माँच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच देशाबाहेर पळून जाता येऊ नये म्हणून ‘इमिग्रेशन नोटीस’ एक दोन दिवसात काढली जाणार असल्याची माहिती मुंबई पोलिस दलातील सूत्रांनी दिली.

राधेमाँ चा डान्स नव्हे, नृत्य !
दिव्य मराठी प्रतिनिधीने राधेमाँना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या एकांतवासात आहेत. कुणालाच भेटीची परवानगी देत नाहीत, असे सांगत त्यांचे भक्त संजीव गुप्ता यांनी रोखले. राधेमाँ भक्तांनी दिलेली वस्त्रे त्यांच्या समाधानासाठी परिधान करून डान्स नव्हे तर नृत्य करतात. नृत्य ही भारतीय संस्कृतीची अनादिकालापासूनची परंपरा आहे. त्यात गैर काहीच नाही. मात्र, विचित्र मानसिकतेचे लोक त्यातून गैरअर्थ काढून अपप्रचार करत आहेत, असे गुप्ता म्हणाले.

पुढील स्‍लाइड्स वाचा काय म्हणाले पोलिस आयुक्त अमितेशकुमार... बघा संबंधित फोटोज...