आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : राधे माँची लग्जरी कार, चाक लाल तर सीटऐवजी बसवले सिंहासन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राधे मॉंच्‍या कारचे पहिले चाक. इन्‍सेट राधे मॉं. - Divya Marathi
राधे मॉंच्‍या कारचे पहिले चाक. इन्‍सेट राधे मॉं.


औरंगाबाद - वादग्रस्‍त धर्मगुरू राधे माँ हिचा बालपण आणि विवाहानंतरचा काही काळ अती सामान्‍य कुटुंबात गेला. मात्र, तिने भक्‍तांच्‍या भावनेचा बाजार सुरू केल्‍यानंतर तिचे जीवनमानच बदलले. कधी एकेकाळी कपडे शिवून संसाराचा गाडा हाकणारी राधे मां आज एखाद्या राणीप्रमाणे जीवन जगत आहे. आता मेकअपपासून ते कार, बंगल्‍यापर्यंत तिची लाइफस्टाइल लग्जरी झाली आहे.

राधे मां हिचा मुंबईमध्‍ये सहा मजली लग्जरी बंगला आहे. जगुआर, बीएमडब्लूसारख्‍या अनेक महागड्या कारमधून ती प्रवास करते. एवढेच नाही तर कारमध्‍ये बसण्‍यासाठी तिला सीटच्‍या ऐवजी लाल रंगाच्‍या सिंहासनाची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहे. तसेच तिच्‍याकडे असलेल्‍या प्रत्‍येक कारचे पहिले चाक लाल आहे.
लालच रंग का
राधे माँने स्‍वत:ला देवीचा अवतार घोषित केले आहे. तिचे भक्‍तही तिला देवीचा अवतार मानतात. त्‍यामुळेच तिचे कपडेच नव्‍हे तर कारमधील सिंहासन आणि कारचे पहिले चाक लाल आहे. तसेच तिच्‍याकडे प्रत्‍येक भक्‍ताला ती लाल गुलाब देते.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, पहिले बब्बू मग सुखविंदर कौर आणि आता राधे माँ