आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : मीडियाचे कॅमेरे पाहताच राधे मांने झाकला चेहरा; रडूही कोसळले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - विवाहितेचा छळ करून हुंडा मागितल्‍याचा आरोप असलेली वादग्रस्‍त धर्मगुरू राधे मॉं ही काही दिवसांपासून देशभर चर्चेत आहे. दरम्‍यान, शनिवारी सकाळी ती जेव्‍हा औरंगाबादमधील एका कार्यक्रमात पोहोचली तेव्‍हा मीडियाने तिच्‍यावर होत‍ असलेल्‍या आरोपांबाबत प्रश्‍न विचारलेत. मॉं हिने एकाही प्रश्‍नांचे उत्‍तर दिले नाही. उलट बेशुद्ध होण्‍याचा ड्रामा केला. भाविकांनी तिला कसे तरी कारपर्यंत पोहोचवले. गाडीत बसल्‍यानंतर ती साडीच्‍या पदराने आपला चेहरा झाकण्‍याचा प्रयत्‍न करत होती. दरम्‍यान, तिला आश्रूही अनावर झाले होते.
काय आहे प्रकरण
स्‍वत:ला देवीचा अवतार सांगिणा-या राधे मॉ विरुद्ध मुंबईच्‍या बोरीवली परिसरात हुंडाबळी कायद्यान्‍वे गुन्‍हा दाखल झालेला आहे. तिच्‍यासह यात सात जण आरोपी आहेत. दरम्‍यान, बॉलीवुड गाण्‍यावर नृत्‍य करताना तिचा एक व्‍हीडिओसुद्धा व्‍हायरल झाला.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज....