आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raghuranman Lecture Issue At Aurangabad, Divya Marathi

आपण जे करतो तेच आपल्याकडे परतून येते - रघुरामन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात मंगळवारी आयोजित ‘दिव्य मराठी’च्या तृतीय वर्धापनदिन उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ‘दिव्य मराठी’चे बिझनेस हेड निशित जैन, प्रशांत दीक्षित (संपादक, महाराष्ट्र), निवासी संपादक दीपक पटवे, युनिट हेड अमित डिक्कर, महाव्यवस्थापक (ब्रँडिंग) परमजितसिंग संधू, माजी मंत्री हरिभाऊ बागडे, माजी सभापती राजू शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

दिव्य मराठीतील विविध स्तंभांतून जीवनाचे व्यवस्थापन सांगणार्‍या रघुरामन यांनी व्यासपीठाचा ताबा घेताच, आज मी काय फंडा देईन ते मला माहिती नाही या वाक्याने सुरुवात केली. शेकडेाच्या संख्येने उपस्थितांना चकित करणारे हे वाक्य होते. रघुरामन म्हणाले, व्यवस्थापन म्हणजे काही मंत्र नव्हे ज्याचा जप करावा किंवा वरदानही नाही जे एका विशिष्ट व्यक्तीसाठी आहे. व्यवस्थापन म्हणजे दैनंदिन जीवनातील सुसूत्रता आहे. व्यवस्थापन म्हणजे एक सराव आहे. व्यवस्थापनाची अनुभूती घ्यावी लागते म्हणजे ते आपल्या कार्यशैलीत उतरते. निर्णय घ्या आणि लक्ष निश्चित करा. विचारपूर्वक निवड करा. आयुष्याचा येतो तेव्हा सर्व समीकरणे बदलतात हे कायम लक्षात ठेवा, म्हणूनच निवड जाणीवपूर्वक करा. उत्तम विचारांना मनात स्थान द्या, त्यातून ते तुमचा सराव होतील.

चांगल्या लोकांचे विचार चिरंतन राहतात
जे लोक उत्तम आणि सर्वांगीण विचार करतात, त्यांचे विचार चिरंतन राहतात. प्रत्येक यशस्वी व्यक्ती हा उत्तम व्यक्ती असतो. या वेळी कल्पना चावला यांचे उदाहरण देऊन त्यांनी कल्पनाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विशद केला. कल्पना चावलांना चप्पल तुटल्याने उशीर झाल्याचे कळाले. या गोष्टीच्या खोलात गेल्यावर कल्पनाचे प्रगल्भ विचार पुढे आले. त्या म्हणाल्या,नवी चप्पल घेतली तर एका प्राण्याचा जीव जाईल, त्याऐवजी शिवली तर त्या माणसाच्या कुटुंबाला एक वेळचे जेवण मिळेल. त्या स्वत:तर्फे दरवर्षी दोन विद्यार्थ्यांना नासामध्ये शिकण्याची संधी उपलब्ध करून देत होत्या.

जे कराल तेच परतून येईल
अमेरिकेत 10 मार्च 1994 ला घडलेल्या एका सत्य घटनेविषयी रघुरामन म्हणाले, एका मुलाने इमारतीच्या 10 व्या माळ्यावरून उडी घेतली. आठव्या माळ्यावर लावलेल्या जाळीत तो अडकला मात्र त्याचा मृत्यू झाला होता. तपास करताना आढळले की, त्याच्या डोक्यात गोळी लागली. ही गोळी 9 व्या माळ्याच्या खिडकीतून आली होती.नवव्या माळ्यावरील दांपत्यात भांडण झाले की पती पत्नीला गोळी घालण्याची धमकी द्यायचा. पण त्यांचे हे संवाद गेल्या 40 वर्षांपासून होते. कधीच गोळी चालविली नव्हती. हे दांपत्य त्या मुलाचे पालक होते. त्या मुलाला आर्थिक अडचण होती. ती सोडवण्यासाठी त्याने बंदुकीत गोळी भरली. त्याला वाटले वडील आईवर गोळी चालवतील आणि वडिलांना अटक होईल. संपूर्ण संपत्ती आपली होईल. पण अनेक दिवसांत त्यांचे भांडण कधीच झाले नाही. म्हणून मुलगा आत्महत्या करण्याचे ठरवतो नेमके त्याच दिवशी भांडण होते आणि बंदुकीत त्यानेच टाकलेली गोळी त्याच्यावरच येते. आपण जे काही पेरू तेच परतून येण्याचा नियम अचूकपणे काम करतो.

ज्यावर विश्वास ठेवता त्याचा रोज सराव व्हायला हवा
आपण ज्या गोष्टींवर विश्वास ठेवतो त्याचा सराव आपल्याला करायला हवा अन्यथा त्या लुप्त होतात. हे उदाहरणाद्वारे पटवून सांगताना ते म्हणाले, वहिदा रहेमान यांना ‘ए युनिक लेडी’ असे म्हटले जाते. याचे प्रमुख कारण त्यांची विचारशैली होती. सतरा वर्षांच्या असतानाच त्यांनी गुरुदत्त सारख्या मात्तब्बराला करारात बदल करण्यास भाग पाडले होते. त्या वयात त्यांच्या विचारांमधील सुस्पष्टता आणि कणखरपणा दिसत होता. म्हणून त्या युनिक लेडी म्हणून ओळखल्या गेल्या.