आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi Is Childish Compare To Narendrabhai, Modi's Younger Brother Pralhad Modi Remark

नरेंद्रभाईंच्या तुलनेत राहुल गांधी अजूनही बच्चाच!,मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी यांचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यात नेहमीच तुलना होते. जनमत चाचण्यांतून दोघांची लोकप्रियता तपासली जाते. अशा वेळी मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी यांनी मात्र राहुल हे नरेंद्रभाईंच्या तुलनेत अजून ‘बच्चा’च आहेत, अशा शब्दांत मत मांडले आहे.
‘दिव्य मराठी’ला त्यांनी दिलेल्या खास मुलाखतील काही प्रश्नोत्तरे अशी -
प्रश्न : मोदींच्या तुलनेत राहुल गांधी तुल्यबळ उमेदवार आहेत का?
उत्तर : वयाचा आणि अनुभवाचा विचार केला तर मी कधीही त्यांचा बच्चाच राहणार. तसेच राहुल आणि नरेंद्रभाईंचे आहे. त्यांच्या वयात आणि अनुभवात खूपच अंतर आहे. त्या अर्थाने राहुलजी बच्चेच आहेत. मात्र, कोण पंतप्रधान हवेत, याचा फैसला जनताच करणार आहे. तुमच्या-माझ्या म्हणण्याने काय फरक पडणार.
प्रश्न : मोदींच्या उमेदवारीला भाजपमधून विरोध होत आहे.
उत्तर : बघा, कोणत्याही घरात दहा लोक असतील तर काही मुद्द्यांवरून मतभेद होणारच; पण ते घरातील भांडण आहे. त्याविषयी मला काहीही बोलता येणार नाही. मात्र, भाजपच्या नेतृत्वातील आघाडीला 300 जागा मिळणार, असा मला विश्वास आहे. मीदेखील प्रचारात सामील आहे. परंतु, मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. आमच्या कुटुंबातील कुणाकडेही सरकारी मंडळ नाही. पद नाही.
प्रश्न : गुजरातमधील दारिद्र्यरेषेच्या मर्यादेवरून मोदींवर टीका होत आहे. वास्तव काय आहे?
उत्तर : ही मर्यादा केंद्र सरकारने ठरवली आहे. संसदेत झालेल्या कायद्यावर विधानसभेत निर्णय होत नाही. मुख्य म्हणजे काँग्रेसची सत्ता असलेल्या आंध्र प्रदेशात 267 रुपयांची मर्यादा आहे. त्यावर कुणीच काही का बोलत नाही?
भावंडांचा साधेपणा
भाऊ मुख्यमंत्री असला तरी मोदी भावंडांचे राहणीमान अतिशय साधे आहे. पांढरा पायजमा आणि पांढरा नेहरू शर्ट असा त्यांचा वेश असतो. प्रचार, भेटीगाठीच्या निमित्ताने ते कोणत्याही शहरात गेले तरी ते हॉटेलऐवजी भाजप किंवा संघाच्या कार्यकर्त्याच्या घरीच राहतात.
मोदींचे भाऊबंद
सोम्याभाई-सर्वात
मोठे बंधू- वृद्धाश्रमाचे संचालक
अमृत- दुस-या क्रमांकाचे बंधू - सेवानिवृत्त कर्मचारी
नरेंद्र मोदी - गुजरातचे मुख्यमंत्री
प्रल्हाद - रेशन दुकानदार
पंकज -सरकारी कर्मचारी
बसंती - बहीण गृहिणी