आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi News In Marathi, Congress Vice President, Aurangabad

निवडणुकीचा आखाडा: राहुल गांधी यांची आज औरंगाबादेत जाहीर सभा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची बुधवारी शहरातील मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर दुपारी जाहीर सभा होत आहे. राहुल यांच्यासमवेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच अशोकराव चव्हाण आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर या दोन माजी मुख्यमंत्र्यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले आहे. सभेला महाराष्‍ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, राज्यमंत्री डी. पी. सावंत, माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, शहराध्यक्ष अ‍ॅड. सय्यद अक्रम यांची प्रमुख उपस्थिती राहील.


राहुल यांचे सकाळी 9 वाजता विमानाने शहरात आगमन होईल. तेथून ते शिरपूरकडे (जि. धुळे) रवाना होतील. दुपारी 12 वाजता ते परत शहरात येतील. सुभेदारी विश्रामगृहात भोजन घेतल्यानंतर 1 वाजता ते सभास्थळी येतील. पाऊण तासाच्या उपस्थितीनंतर ते पुन्हा धुळ्याकडे रवाना होणार आहेत. सभेला अपेक्षित गर्दी व्हावी यासाठी पालकमंत्री थोरात मंगळवारी नियोजन करत होते.