आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi Promoting Meeting, Latest News, Divya Marathi,

गर्दी जमवली, पण इच्छुक उमेदवारांचा हिरमोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकल्यानंतर राहुल गांधी यांनी प्रचारसभेचा नारळ बुधवारी (5 मार्च) औरंगाबादेतूनच फोडला. 22 मिनिटांच्या शांत आणि शैलीदार भाषणात त्यांनी भाजपच्या भ्रष्टाचाराची जंत्रीच उपस्थितांसमोर ठेवली. मराठवाड्याचे भूमिपुत्र आणि आदर्श घोटाळ्यात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले अशोक चव्हाण यांना मात्र त्यांनी काँग्रेसच्या मंचावर महत्त्वाचे स्थान दिले. एवढेच नव्हे तर त्यांच्या हस्ते स्वागत स्वीकारून अशोक चव्हाण यांचे या सभेतून ‘ब्रँड लाँचिंग’ केले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
‘लोकसभा-2014’ च्या रणसंग्रामात काँग्रेसला भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर जेरीस आणणार्‍या आम आदमी पार्टी आणि भाजपने चांगलेच खिंडीत पकडले आहे. राहुल यांनीही काँग्रेसवर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावत काँग्रेस पक्षच भ्रष्टाचारविरोधी असल्याचे ठासून सांगितले. नरेंद्र मोदी यांच्या गुजरात मंत्रिमंडळात तीन मंत्री भ्रष्ट आहेत. त्याशिवाय कर्नाटकचे भ्रष्ट मुख्यमंत्री येदियुरप्पा यांना पक्षप्रवेश देऊन भाजपने काय सिद्ध केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भ्रष्टाचारविरोधी आणखी सहा विधेयके संसदेत मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, प्रत्यक्षात राहुल यांनी आदर्श घोटाळ्यात आरोपत्र दाखल झालेले माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचे सभेच्या निमित्ताने ‘ब्रँड लाँचिंग’ केले.
चव्हाणांकडे मराठवाड्याची जबाबदारी
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासोबत अशोक चव्हाण यांचीही मंचावर उपस्थिती होती. शिवाय राहुल यांचा चव्हाण यांनी काँग्रेसचा पारंपरिक ‘सुताचा हार’ घालून सत्कार केला. राहुल यांनी अशोक चव्हाण यांच्या नावाचाही भाषणात उल्लेख केला. त्यामुळे मराठवाड्यातील पहिल्या सभेतच अशोक चव्हाण यांचे ‘ब्रँड लाँचिंग’ करून विलासराव देशमुखांची पोकळी लोकसभा निवडणुकीत भरून काढण्याची रणनीती आखल्याची प्रचिती सभेत आली.
बसगाड्या रिकाम्याच
राहुल यांच्या सभेसाठी सबंध मराठवाड्यातून एसटी बस आणण्यात आल्या होत्या, परंतु बहुतेक बसमध्ये कार्यकर्त्यांची संख्या कमी होती आणि जे कार्यकर्ते बसने आले त्यातील काही जणांनी तर शहरातील खासगी कामे आटोपण्यासाठी बाजारात फिरणे पसंत केले.
चार वर्षांनंतर चव्हाणांना र्शेष्ठींची र्मजी
मुंबई हल्ल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी 5 डिसेंबर 2008 रोजी राजीनामा दिला होता. सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्रिपदाची माळ अशोक चव्हाणांच्या गळ्यात घातली. 8 डिसेंबर 2008 रोजी चव्हाणांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अकरा महिन्यांनंतर पुन्हा त्यांना मुख्यमंत्रिपद मिळाले. मात्र, आदर्श घोटाळ्यात त्यांचे नाव आल्यामुळे 9 नोव्हेंबर 2010 रोजी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, नांदेड महापालिकेत वर्चस्व सिद्ध केल्यानंतर त्यांनी पुन्हा सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. आता चार वर्षांनंतर त्यांना पक्षर्शेष्ठींची र्मजी राखण्यात यश मिळाले आहे.
गर्दीचे दावे
01 लाख मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानाची क्षमता
01 लाखापेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित असल्याचा काँग्रेसचा दावा
50 हजार जण पोलिसांच्या मते उपस्थित
54 मिनिटे चालली सभा
22 मिनिटे चालले राहुल यांचे भाषण 500 बसमधून कार्यकर्ते झाले दाखल.