आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपमान करायचा म्हणून मित्रांनीच काढला काटा, मारेकऱ्यांना २४ तासांत अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहूल - Divya Marathi
राहूल
औरंगाबाद - तो नेहमी अपमान करायचा. दोन महिन्यांपूर्वी त्याचे मित्रांसोबत कडाक्याचे भांडणही झाले होते. हाच राग मनात ठेवून दोघांनी शनिवारी त्याच्यावर चाकूचे सपासप वार करून त्याला देवळाईजवळील टेकडीवर फेकून दिले. सोमवारी त्याचा मृतदेह सापडला. उमेश बबन चव्हाण आणि सचिन आत्माराम चंदनशिव (रा. राजनगर, मुकुंदवाडी) यांच्या अटकेनंतर राहुल बाळू लांडगे (१८, रा. अंबिकानगर) या तरुणाच्या खुनाचे गूढ उकलले. चिकलठाणा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासांतच आरोपींना जेरबंद केले.
शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास क्रिकेट खेळायला जातो, असे वडिलांना सांगून राहुल घराबाहेर पडला होता. तो उमेश आणि सचिनसोबत गेला होता. दोघांनी त्याला गोड बोलून फिरायला जाऊ, असे सांगितले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून तो त्यांच्यासोबत गेला. दुपारी चारच्या सुमारास बीड बायपास रस्त्यावरून देवळाईजवळील साई टेकडी परिसरात ते गेले. साई टेकडीच्या अलीकडे असलेल्या एका टेकडीवर ते चढले. तेथे ते दारू प्यायले. अंधार पडण्याच्या सुमारास उमेशने राहुलसोबत भांडण उकरून काढले. तू आमचा अपमान करतो का? असे म्हणत त्याचा गळा चिरून पोटावर, छातीवर चाकूने वार केले. राहुल रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर दोघांनी पळ काढला.

गुराख्यांना दिसला मृतदेह : रविवारीराहुलचा मृतदेह तेथेच पडून होता. सोमवारी सकाळी गुरे चारण्यासाठी गेलेल्या लोकांना तो दिसला. त्यांनी ही माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. त्यांनी ती माहिती पोलिसांना कळवताच चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक प्रिया थोरात, पोलिस उपअधीक्षक सुनील लांजेवार, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख डॉ. कांचनकुमार चाटे, उपअधीक्षक महेश आंधळे यांची टीम घटनास्थळी पोहोचली.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी...