आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल जाताच रस्त्याचे पितळ उघडे; बाबरा येथील ग्रामस्थांचा जि.प. अभियंत्यांना घेराव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा दुष्काळी दौरा जाहीर होताच बाबरा ते खामगावदरम्यान 11 किलोमीटरचा रस्ता माती टाकून तयार करण्यात आला. परंतु पहिल्याच पावसात या रस्त्यावर चिखल झाल्याने अनेक वाहनचालक घसरून पडले. दरम्यान, रस्त्याचे तत्काळ डांबरीकरण करावे, यासाठी संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी (4 जून) जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भरतकुमार बाविस्कर यांना घेराव घातला.

राहुल यांची सुविधा व्हावी म्हणून प्रशासनाने तात्पुरता रस्ता केला, परंतु त्याचा ग्रामस्थांना प्रचंड त्रास होत असल्याचा आरोप करण्यात आला. चिखलामुळे औरंगाबाद- बाबरा बसदेखील रस्त्यात अडकली होती. त्यामुळे दोन तास वाहतुकीचा खोळंबा झाला.

पावसाळ्याच्या तोंडावर अशी अडचण उद्भवली असल्याने येथे तत्काळ डांबरीकरण करण्यात यावे, असा आग्रह धरत ग्रामस्थांनी बांधकाम विभागात ठिय्या मांडला. या वेळी जिल्हा परिषद सदस्य संगीता मोटे, काकासाहेब मोटे, पंचायत समिती सदस्य मोहन पाटील सोनवणे, भानुदास तायडे यांची उपस्थिती होती
रस्त्यावर माती टाकल्याने सर्वत्र चिखल झाला आहे. अनेक दुचाकीस्वार घसरून पडले आहेत. चिखलामुळे बसही अडकली. त्यामुळे तातडीने रस्त्याचे डांबरीकरण करावे. संगीता मोटे, जिल्हा परिषद सदस्य.

गांधींसाठी रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवण्यात आले. मात्र, त्यामुळे समस्या सुटण्याऐवजी आणखी वाढली आहे. मोहन पाटील सोनवणे, पंचायत समिती सदस्य, फुलंब्री.