आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raid News In Marathi, Divya Marathi, Election Commission Of India

सावंगीत सोने, करमाडला साडेबारा लाख रुपये जप्त; आचारसंहिता लागू झाल्यानंतर पहिलीच कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील करमाड येथे १२ लाख ५० हजार रुपये तर सावंगी टोलनाक्यावर सोन्याचे दोन किलो दागिणे जप्त केले.विधानसभा निवडणूक निमित्ताने सावंगी टोल नाक्यावर भरारी पथकाची तपासणी सुरू असताना औरंगाबादहून येणारी स्विफ्ट कार(क्र-एम.एच.२० बी.वाय ७३५९) या कारची तपासणी केली असता त्यात साेन्याचे दािगणे अाढळले.
व्यापारी िजज्ञेश भरतकुमार ठक्कर (वय ४०) हे तयार दािगणे फुलंब्री व िसल्लाेड येथील व्यापाऱ्यांस देण्यास िनघाले हाेते. या वेळी सावंगी टाेल नाक्यावर तपासणी पथकाने ही कारवाई केली. हे साेन्याचे दािगणे २२ कॅरेटचे असून दाेन िकलाे १२ ग्रॅम ८८० इतके अाहेत. या सोन्याची अंदाजे िकंमत ५० ते ५५ लाख रुपये आहे.

दुसऱ्या घटनेत राधेश्याम शर्मा व रितेश शर्मा हे एमएच-२८ व्ही ५८७९ क्रमाकांच्या टाटा इंडिगोतून करमाडकडे जात असताना पथकाने मोटार थांबवून तपासणी केली असता आत दोघांकडे मिळून १२ लाख ५० हजार रुपये रोख आढळले. यातील रितेश हा औरंगाबादचा तर राधेश्याम हा अहमदनगर तालुक्यातील शेवगावचा रहिवासी आहे. औरंगाबादेत जमीन खरेदी केल्यानंतर रजिस्ट्रीसाठी ही रक्कम सोबत ठेवल्याचा दावा त्यांनी केला, परंतु त्यांच्याकडे एकही कागदपत्र नव्हते. त्यामुळे ही रक्कम करमाड पोलिस ठाण्यात नेण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.

जलि्ह्यात प्रत्येक मतदारसंघात प्रत्येकी ३ भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. ५० हजारांपेक्षा जास्त रोख, १० हजारांपेक्षा मोठ्या किमतीची भेटवस्तू, मद्य याची तपासणी केली जाईल. कागदपत्रे नसतील तर वरील सर्व गोष्टी जप्त केल्या जाणार आहेत.असे उपजिल्हाधिकारी (निवडणूक) शशिकांत हदगल यांनी सांगितले.