आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठण रोडवरील कुंटणखान्यावर धाड, दोघांना अटक, मुख्य सूत्रधार पसार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पैठण रोडवरील उच्चभ्रू वसाहतीत सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी शुक्रवारी रात्री धाड टाकली. दोघांना अटक करून दोन मुलींची सुटका करण्यात आली. कुंटणखानाचालक मात्र फरार झाला असून घटनास्थळावरून ५२ हजार रुपये, मोबाइल, एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पैठण रोडवरील सुशांत रोहाऊस परिसरात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी विशेष पथकाचे पोलिस निरीक्षक बी. डी. काकडे यांच्याकडे कारवाईची जबाबदारी सोपवली. काकडे यांच्यासह पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी आणि पथकातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी रात्री पावणेआठच्या सुमारास कुंटणखाना परिसरात सापळा रचला. बनावट ग्राहक पाठवून छापा मारला. कारवाईचा सुगावा लागल्याने कुंटणखानाचालक तुषार राजन राजपूत (३४, रा. गवळीपुरा, छावणी) याने तेथून पळ काढला, तर पराग नावंदर (३२, रा. औरंगपुरा), आशिष बियाणी (३४, रा. छावणी) या दोघांना पोलिसांनी पकडले. तसेच २० ते २२ वर्षांच्या दोन मुलींची (रा. मुंबई) सुटका करण्यात आली असून त्यांची रवानगी महिला आधार संस्थेत करण्यात आली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाड्याने घेतले होते रो-हाऊस
कुंटणखाना चालक तुषार राजपूत याच्यावर अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. संबंधित पोलिस ठाण्यातून त्याची माहिती मागवण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक काकडे यांनी सांगितले. पैठण रोडवरील त्या रोहाऊसध्ये गेल्या १५ दिवसांपासून कुंटणखाना सुरू होता. आरोपीने हे रोहाऊस भाडेतत्त्वावर घेतले असून घरमालकाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...