आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीत कॅसिनाेवर छापा; 24 ताब्यात, 9 लाख जप्त, हायटेक जुगार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व सध्या अागामी अागामी साईबाबा शताब्दी महाेत्सवाची तयारी सुरू असलेल्या शिर्डीत अवैध धंद्यांनीही कळस गाठला अाहे. हत्या, भाविकांची लूटमार, साई भक्तनिवासात कुलपे ताेडून हाेणाऱ्या चाेऱ्या, यात भरीस भर म्हणून गाेव्याच्या धर्तीवर तेथे अाॅनलाइन कॅसिनाेच्या रूपाने जुगारही सुरू झाले अाहेत.
 
त्याची माहिती मिळताच शहरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या ऑनलाइन कॅसिनाे अड्ड्यांवर शिर्डी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळनंतर छापे टाकून नऊ लाख ४५ हजार रुपयांची राेख रक्कम अाणि इतर साहित्यासह २४ जणांना ताब्यात घेतले. त्यात नाशिकमधील पाच गुन्हेगारांचा समावेश अाहे.  
 
जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा व उपविभागीय अधिकारी डॉ. सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी शिर्डी शहरातील विविध ठिकाणी संगणक व मोबाइलवर अॅप्सद्वारे खेळल्या जाणाऱ्या बिंगाे रोलेट नावाच्या (कॅसिनो) मटक्यांच्या अड्ड्यावर छापे टाकण्यात अाले. त्यात ४० संगणक, १ लॅपटॉप, १४ मोबाइल, ३ मोटारसायकल व रोख रक्कम ६३ हजार १३० असा नऊ लाख ४५ हजार ४५० रुपयांची ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणारी साधने पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी मयूर रघुनाथ शेर्वेकर, विशाल भाऊसाहेब राहिंज, शंकर अशोक बर्डे, अविनाश कारभारी बाणेदार, अस्लम हमीद शेख, प्रवीण सुभाष तोरडमल, सागर पुंडलिक तायडे, निखिल मच्छिंद्र वारुळे, राजू बाबूलाल जैन, मुन्ना गफूर शेख, आकाश रवींद्र साळकर, प्रशांत बबन बैरागी (सर्व रा. शिर्डी), रोहित रतन गायकवाड (रा. सावळीविहीर), मयूर श्यामराव बाभूळकर, मनोज आनंदा जाधव (दाेघेही रा. कोपरगाव), प्रमोद रमेश तुरकणे (रा. पिंपळवाडी), गोरख सुरेश वदक (रा. निमगाव), अक्षय मच्छिंद्र जुंधारे (रा. वेस), संदीप मच्छिंद्र शिरोळे (रा. वाळकी), गणेश बाळासाहेब बोरस्ते, रोहित राजू साळवे, अक्षय राजेश गायकवाड, अक्षय संजय कांबळे, स्वप्निल किशोर साळवे (सर्व रा. नाशिक) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  त्यांच्याविराेधात  सहा गुन्हे दाखल करण्यात अाले अाहेत.

जप्त केलेला एेवज असा  
४० संगणक, १ लॅपटॉप  
१४ मोबाइल, ३ मोटारसायकल
६३,१३० रुपये राेख
बातम्या आणखी आहेत...