आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावठी दारूभट्टीवर छापा, दोन महिलांना केली अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तळ्याचीवाडीत गावठी दारू अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. - Divya Marathi
तळ्याचीवाडीत गावठी दारू अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला.
खुलताबाद- तालुक्यातील तळ्याची वाडी शिवारात चोरट्या मार्गाने सुरू असलेल्या गावठी दारूभट्टीवर खुलताबाद पोलिसांनी छापा मारून दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सकाळी ११ च्या सुमारास हा गावठी दारूचा अड्डा पुन्हा उद््ध्वस्त करण्यात आला आहे. तळ्याची वाडी शिवारात १५ दिवसांपूर्वी खुलताबाद पोलिसांनी छापा मारून गावठी दारूअड्डा उद्ध्वस्त केला होता. पोलिसांना न जुमानता पुन्हा सुरू केला होता.
बातम्या आणखी आहेत...