आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांचा पुढाकार; देशी दारू विक्रेत्याच्या घरी छापे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - इसारवाडी येथील महिलांच्या पुढाकारातून पैठण एमआयडीसी ठाण्याच्या पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या घरी छापे मारून आठ हजार ३०० रुपये किमतीच्या १६६ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या.
 
जायकवाडी परिसरातील राहुलनगरच्या महिलांनी थेट पोलिस ठाणे गाठून अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाईची मागणी रेटून धरली होती.  तसे निवेदनही पोलिस पाटील द्वारकाबाई खडसन, माजी सभापती पुष्पा केदारे, सुमनबाई खडसन यांच्यासह शंभराहून अधिक संतप्त महिलांच्या उपस्थिती देण्यात आले.  
 
इसारवाडी येथील दिलीप खोंडे व नामदेव बरडे हे अनेक दिवसांपासून अवैध दारूविक्री करत होते. यांची वारंवार तोंडी तक्रार केली होती. परंतु, योग्य कारवाई होत नसल्याची बाब महिलांनी सपोनि ज्ञानेश्वर पायघन यांच्या निदर्शनास आणून दिली. तुम्ही यासाठी पुढाकार घ्या, पोलिस तुमच्यासोबत असतील म्हणत सपोनि पायघन यांनी महिलांना बरोबर घेऊन आज इसारवाडी येथील दिलीप खोंडे यांच्या घरी एक ग्राहक पाठवला. त्याला दारूची बाटली सहज मिळताच त्याच्या घराची झाडाझडती घेतली. या वेळी जमिनीत पुरून ठेवलेल्या १५६ दारूच्या बाटल्या आढळून आल्या. तर नामदेव बरडेच्या घरात १० देशी दारूच्या बाटल्या आढळल्या.
बातम्या आणखी आहेत...