आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कत्तलीसाठी छावणीतील जनावरे सिल्लेखान्यात!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - छावणी येथील गुरांच्या बाजारात ३१ जनावरे बुधवारी अचानक मृत पावली होती. त्यानंतर इतर जनावरे त्यांच्या मालकाच्या ताब्यात, तर आजारी जनावरे पशुचिकित्सालयात पाठवण्यात आली होती. हीच जनावरे दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी पहाटे सिल्लेखाना येथील कत्तलखान्यात आढळली. पोलिस महापालिकेच्या पथकाने छापा टाकून २९ गायी आणि २१ बैलांची सुटका केली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ कलम आणि प्रमाणे क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटकही करण्यात आली.
छावणी येथील गुरांच्या बाजाराची स्थिती अतिशय दयनीय असल्यामुळे तेथे सुधारणा होईपर्यंत हा बाजार बंद करण्याचे आदेश पोलिस आयुक्त आणि छावणी परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर विक्रीस आणलेली जनावरे मालक घेऊन गेले. मात्र ही जनावरे कोठे नेली जातात यावर पोलिसांनी पाळत ठेवली. त्यानुसार नियोजन करून पहाटे चार वाजता गुन्हे शाखा, विशेष शाखा, क्रांती चौक पोलिस ठाणे महापालिकेचे अधिकारी कर्मचारी अशा सुमारे १०० जणांच्या पथकाने सिल्लेखान्यात छापा मारला असता १० जनावरे मृतावस्थेत आढळली, तर ५० जनावरांच्या कत्तलीची तयारी सुरू होती. ही जनावरे पथकाने ताब्यात घेतली. याप्रकरणी महापालिकेचे पथकप्रमुख मोहंमद कदीर खान मोहंमद याकूब खान (५७) यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

जनावरांवरील खुणांमुळे उलगडा : छावणीबाजारात आलेल्या जनावरांवर पोलिसांनी निळ्या रंगाने खुणा करून ठेवल्या होत्या. त्यावरून ही जनावरे छावणी बाजारातूनच आणली असल्याचा उलगडा झाला. मनपा उपायुक्त आयुब खान, रवींद्र निकम, आरोग्य अधिकारी सुहास जगताप, मुख्य पशुसंवर्धन अधिकारी बाबासाहेब उनवणे, पशुधन पर्यवेक्षक शेख शाहेद, अनंत जाधव, पोलिस निरीक्षक नागनाथ कोडे, गोवर्धन कोळेकर, मधुकर सावंत, ज्ञानेश्वर साबळे, चंद्रकांत सावळे, सी.डी शिनगारे यांच्या पथकाने ही कारवाई केली. ताब्यात घेतलेली जनावरे महापालिकेच्या कोंडवाड्यात ठेवण्यात आली आहेत.

जनावरांचा मृत्यू : छावणीबाजारातील मृत जनवारांचे व्हिसेरा न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्यांचा मृत्यू गुदमरल्याने तसेच जुलाबामुळे झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

तळमजल्यात केली जात होती कत्तल
तळघरात जनावरांची कत्तल केली जात होती. मुत्तलीब कुरेशीच्या वाड्यात १० जनावरे जनावरांचे ६०० किलो मांस होते. मोईन कुरेशी याच्या वाड्यात २० जिवंत जनावरे जनावरांचे ६०० किलो मांस, मेहबूब कुरेशीच्या वाड्यात जिवंत जनावरे सापडली. सत्तार कुरेशीच्या वाड्यात जनावरांची कातडी मांस जप्त करण्यात आले. अखिल कुरेशीच्या वाड्यात जनावरे कार्यालय गल्लीत १० जनावरे अशी एकूण ५० जनावरे जप्त केली आहेत. यात बैल, २३ गायी, कालवडी, १० गोऱ्हे वासरांचा समावेश असल्याचे पीआय नागनाथ कोडे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...