आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अवैधरीत्या सावकारी; व्यापाऱ्याच्या घरावर छापा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर स्टेशन- बाजारपेठेतील दोन अवैधरीत्या सावकारी करणाऱ्या व्यापाऱ्याच्या घरावर सहकार विभागाच्या दोन पथकाने बुधवार (दि. १५) दुपारी छापा टाकला. यामध्ये दहा दस्तनोंदण्या, काही खरेदीखताच्या नकला, सातबाऱ्यासह काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली आहेत.

व्यापारी रविराज समदरिया (मनमंदिर कापड दुकान) पिंपळगाव येथील भीमराज पांडू बडुगे अशी अवैधरीत्या सावकारी करणाऱ्यांची नावे असल्याचे पथकप्रमुख बलराम नवथर यांनी सांगितले. त्यांच्याविरोधात रंजक उगले (रा. दहेगाव, ता. वैजापूर) यांनी सहायक निबंधक गंगापूर तथा वैजापूर यांच्या कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने गंगापूर सहायक निबंधक यांच्या कार्यालयाने बुधवारी मनमंदिर कापड दुकानाची तसेच बडुगे यांच्या घराची झडती घेतली असता त्यात १० शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या रजिस्ट्री, काही प्लॉटच्या खरेदी खताच्या नकला, सातबारे, काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली. सहकारी अधिकारी विजयसिंग राजपूत, ए. व्ही. पिंगट, हजारी, आर. एस. चव्हाण, बी. ए. पाठे, एस. खरात यांच्या पथकाने ही कारवाई केली.
बातम्या आणखी आहेत...