आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण पोलिसांचे 240 जुगार अड्ड्यांवर छापे, शहरात मात्र केवळ एकच कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गणेश मंडळांतील कार्यकर्त्यांनी जुगार खेळावा वा खेळू नये यावर मतमतांतरे सुरू आहेत. खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अतुल सावे यांच्या विधानावरून ‘दिव्यमराठी’नेहे प्रकरण उचलले. जुगार खेळणे हा प्रकार वाईट आहे, यावर प्रकाश टाकला.
 
गणेशोत्सवाच्या काळात ग्रामीण पोलिसांनी मात्र २२२ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिसांनी जुगाराबाबत अयशस्वी कारवाई केली. आतापर्यंत दोन दिवसांत केवळ एकच कारवाई केली. यावरून दोन पोलिस प्रशासनातील कारवाईचा फरक स्पष्ट होतो. पोलिस आयुक्त यशस्वी यादव म्हणतात, तक्रार आल्यास निश्चित कारवाई केली जाते. या उलट आम्ही तक्रारीची अजिबात वाट पाहत नाही, थेट कारवाई करतो, असे स्पष्ट मत पोलिस अधीक्षक डाॅ. आरती सिंह यांनी मांडले.
 
पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह या चार महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांवर लक्ष केंद्रित करत कारवाई करण्यास सुरुवात केली. २४० जुगार अड्ड्यांवर छापे मारत २१ लाख ५९ हजार ३६१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केली. अवैध दारू, जुगार, वाळू वाहतूक करणाऱ्यांवर हजार ८८ जणांवर छापे मारत ३७ लाख ७० हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर आळा घालत कारवाई करण्यात आली असून कोटी १५ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

वाहतुकीला शिस्त लावण्याचे प्रयत्न :  ग्रामीण पोलिसांनी अवैध वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मागील आठ महिन्यांत ३७ लाख ५७ हजार ५४० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यात विनाहेल्मेट दुचाकी चालवणे, राँग साइड गाडी चालवणे, नो पार्किंगमधून जाणे, मद्यसेवन करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे वारंवार नियम तोडणाऱ्या ८२ जणांचे वाहन परवाने रद्द करावेत, असा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. गेल्या दहा दिवसांत हजार १०८ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून लाख २१ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
 
अन् जनता माहिती देण्यासाठी समोर येते
आम्ही कारवाईसाठी जनतेकडून तक्रार येण्याची वाट पाहत नाही. माहिती मिळाली की कारवाई करतो. पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली की जनतादेखील तक्रार देण्यास पुढे येते. अगदी मध्यरात्रीदेखील लोक फोन करून अवैध धंद्याविषयी माहिती देतात.
- डॉ. आरती सिंह, औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक
 
दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या कामाची पद्धती
गणेशोत्सवादरम्यान ग्रामीण पोलिसांनी २४० जुगार अड्ड्यांवर छापे मारले, तर याउलट शहर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी पुंडलिकनगरमध्ये केवळ एका जुगार अड्ड्यावर छापा मारला. शहर आणि ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत जमीन आसमानचा फरक आहे. पोलिस आयुक्त यादव म्हणता, तक्रार आली तर निश्चितपणे कारवाई केली जाते.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा,  आम्ही तक्रारीची वाट पाहत नाही- एसपी डॉ. आरती सिंह
बातम्या आणखी आहेत...