आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Bridge Repair, Latest News In Divya Marathi

अखेर ब्रिटिशकालीन रेल्वेपुलाची दुरुस्ती; ब्रिटिश सरकारने वर्षभरापूर्वी दिलेल्या इशार्‍याची दखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- देवळाली कॅम्प येथील ब्रिटिशकालीन लाल पुलाच्या दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. रुळाच्या अप बाजूचे काम पूर्ण झाले असून, सोमवारी डाउनचे काम होणार आहे. पुलाचे आयुष्य संपल्याची सूचना ब्रिटिश सरकारने रेल्वे प्रशासनास गेल्या वर्षी दिली होती. त्यानंतर वर्षभराने हे काम हाती घेण्यात आले. रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात असल्याचे ठळक वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केले होते.
‘अप’चे काम पूर्ण : अप बाजूकडील खांब क्रमांक 38/40 जवळ जुने गल्डर काढून नवे टाकले. दुपारी 12 ते 4 पर्यंत काम चालले. 4.50 वाजेच्या सुमारास पुष्पक एक्स्प्रेस मुंबईकडे रवाना झाली.

मुख्य अभियंता राजकुमार, आर. सी. ठाकूर, मंडल अभियंता पवन पाटील, कार्यकारी अभियंता मयूर वर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली 20 अधिकारी, 200 कर्मचार्‍यांनी लाल पुलाची दुरुस्ती केली. मुंबईकडे जाणारी गोदान, गोरखपूर, हॉलिडे स्पेशल, पवन, कामायनी एक्सप्रेस या गाड्या लहवित स्थानकावर, तर जनशताब्दी अस्वली स्थानकावर, मुंबईकडे जाणारी भुसावळ-मुंबई पॅसेंजर, गीतांजली नाशिकरोडला अनुक्रमे 15, 20 व 30 मिनिटे थांबविण्यात आल्या.