आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद-मुंबई रेल्वे प्रवास आता बसपेक्षाही महागला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- केंद्र सरकारने केलेल्या रेल्वे भाडेवाढीमुळे औरंगाबादकरांसाठी मुंबईचा रेल्वे प्रवास जवळपास बसच्या तिकिटापेक्षा महाग झाला आहे. सध्या खासगी एसी बसचे आसनी तिकीट 500 रुपये आहे, तर थ्री टायर एसी रेल्वे भाडे 554 रुपये झाले आहे. रेल्वे मालवाहतुकीच्या दरातही 6.5 टक्क्यांची वाढ झाल्याने औरंगाबादच्या उद्योजकांवर सुमारे 72 कोटींचा बोजा पडणार आहे. दरम्यान, काँग्रेसच्या राजवटीत रेल्वे दरवाढीला विरोध करणार्‍या शिवसेनेने सत्तेत जाताच सूर बदलला आहे. विकासासाठी भाडेवाढ आवश्यक असल्याचे सांगत मराठवाड्याच्या रेल्वे विकासासाठी काय करणार, असा सवाल रेल्वेमंत्र्यांना विचारणार असल्याचे म्हटले आहे. सध्या औरंगाबाद ते मुंबई प्रवासासाठी सहा रेल्वे उपलब्ध आहेत. त्यातून दररोज किमान 12 हजार प्रवासी ये-जा करतात. आतापर्यंत त्यांना थ्री टायर एसीसाठी 485 रुपये मोजावे लागत होते, तर बसचे भाडे 500 रुपये होते. आज झालेल्या भाडेवाढीमुळे रेल्वेचे तिकीट 554 रुपये झाले आहे.
औरंगाबादेतील उद्योजक, व्यापार्‍यांवर 72 कोटींचा बोजा
औरंगाबादेतील उद्योजक रेल्वेतून मालवाहतुकीवर दरवर्षी सुमारे 1100 कोटी, तर किरकोळ व्यापारी सुमारे 50 कोटी रुपये खर्च करतात. त्यात प्रामुख्याने टीव्ही, फिल्म्स, लोखंडी स्क्रॅप, पत्रे, ऑटोमोबाइल्सचे सुटे भाग, सिमेंट, कृषी उत्पादने आदींचा समावेश आहे. आज झालेल्या 6.2 टक्के भाडेवाढीमुळे उद्योजक, व्यापार्‍यांवर 72 कोटींचा बोजा पडणार आहे. मात्र, उद्योग जगताने या भाडेवाढीला विरोध दर्शवला नाही. गेल्या काही वर्षांत भाडेवाढ झाली नसल्याने विकासही थांबला होता. भाडेवाढीतून विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे, असे सीएमआयएचे माजी अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले. उद्योजक फुलचंद जैन यांनी ही दरवाढ महागाई वाढवणारी असल्याचे मत नोंदवले.
प्रवासी

रेल्वे भाडेवाढीमुळे सर्वच जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ होणार आहे. हे कसले अच्छे दिन आहे? प्रिया अय्यर, प्रवासी रेल्वेने भाडेवाढीच्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास करावा. भाडेवाढीतून येणारी रक्कम मराठवाड्यातील रेल्वेसेवेच्या सुधारणांवर खर्च व्हावी. प्रवीण वैष्णव, प्रवासी सध्या सर्व लोक महागाईने त्रस्त आहेत. त्यात या भाडेवाढीने भर टाकली आहे. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा. अनुराधा कुलकर्णी, प्रवासी ही भाडेवाढ आमच्या मुळावर येणारी आहे. मोदी सरकार सामान्यांचा विचार करणारे आहे असे वाटले होते. मात्र सर्वांचाच अपेक्षाभंग झाला. किशोर सोनी,