आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Development Committee Chairman Request To Railway Minister For Marathwada Railway Development

मराठवाड्यातील रेल्वे विकासासाठी मंत्र्यांना साकडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे, औद्योगिक वसाहती आणि शैक्षणिक संस्थांमुळे देश विदेशातील पर्यटक, विद्यार्थी, चाकरमान्यांचा राबता येथे मोठ्या प्रमाणावर आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटन उद्योग व्यवसायाला चालना मिळावी यासाठी मराठवाडा रेल्वेचा सर्वांगीण विकास करण्यात यावा, यासाठी मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा स्वातंत्र्यसेनानी ताराबाई लड्डा यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची दिल्ली येथील भेट घेऊन साकडे घातले.

रेल्वेमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सुरेश प्रभू जुलै रोजी औरंगाबादेत येत आहेत. या पार्श्वभूमीवर मराठवाड्याच्या रेल्वे विकासासंदर्भातील निवेदन रेल्वेमंत्र्यांना देण्यात आले. यात रेल्वे दुहेरीकरण आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने प्रकल्प सुरू करण्यासह विविध मागण्यांचा समावेश आहे. निवेदनात म्हटले आहे की, देशात चार रेल्वे संशोधन केंद्र निर्माण करण्याची आपण घोषणा केली होती. त्याची पूर्तता म्हणून आैरंगाबादला एक रेल्वे संशोधन केंद्र उभारावे आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कै. गोविंदभाई श्रॉफ यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या (२४ जुलै) जन्मदिनानिमित्त या केंद्राला त्यांचे नाव द्यावे. औरंगाबादला पीटलाइन टाकावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, मुकुंदवाडी स्टेशनवर पोलिस चौकी सुरू करावी.
औरंगाबाद-चाळीसगाव
औरंगाबाद-चाळीसगाव मार्ग जोडला जावा तसेच औरंगाबादला देशातील सर्व पर्यटनस्थळांशी जोडले जावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दुहेरी लाइन टाकावी
मुदखेड -परभणीदरम्यान दुहेरी लाइन टाकण्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करून कामाला सुरुवात झाली आहे. पण परभणी ते मनमाड अतिमहत्त्वाचा मार्ग आहे. विनाअडथळा प्रवासासाठी या ३०० किमीच्या मार्गावर दुहेरी लाइन टाकावी.
प्रकल्प सुरू करा
पूर्णा येथे रेल्वे प्रशासनाच्या मालकीची मोठ्या प्रमाणावर जमीन आहे. तेथे रेल्वे डबे निर्मितीचा कारखाना सुरू करावा. यामुळे मराठवाड्यातील हजारो बेरोजगारांना रोजगार मिळेल. औरंगाबादेतील जमिनीवर झालेले अतिक्रमण काढून या जागेचाही उपयोग करावा.
रोटेगाव ते कोपरगाव
रोटेगाव ते पुणतांबा २७ किमी रेल्वेमार्ग करण्याचे निश्चित झाले आहे, पण या मार्गावर गोदावरीचा पूल येत असल्याने खर्च अधिक येणार आहे. त्याऐवजी एक पटरी बाजूला टाकून रोटेगाव ते कोपरगाव ३५ किमी रेल्वेमार्ग जोडावा. यामुळे मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्र कोकण हे भाग जोडले जातील.