आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे व्यवस्थापकांकडून तीन रेल्वे गेटची केली अचानक पाहणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नांदेड रेल्वे विभागाचे व्यवस्थापक डॉ. ए. के. सिन्हा यांनी रविवारी शहर परिसरातील तीन रेल्वे फाटकांची अचानक तपासणी केली. गेट क्रमांक ६६, ६७ आणि ५५ ला अचानक भेट देऊन गेटमन कशा पद्धतीने काम करतात, याची पाहणी केली. ६७ क्रमांकाच्या गेटवरील कर्मचारी के. आर. सरोज नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करत असल्याचे पाहून त्यांचा दोन हजार रुपये बक्षीस देऊन गौरव केला, तर उर्वरित गेटमनला नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले.

मुकुंदवाडी स्थानकाची पाहणी : सिन्हायांनी मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाची पाहणी केली. प्लॅटफॉर्मवरून लोक दुचाकी नेणे, बसण्यासाठी असुविधा, अस्वच्छता आणि डी दर्जानुसार विकास कामे करण्यासाठी त्यांनी काही बाबींची नोंद घेतली. तातडीने डी दर्जाच्या सेवा येथे उपलब्ध होतील, प्लॅटफॉर्मवरील दुचाकी ने आण करणे बंद होईल, या दृष्टीने आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

मनमाड-काचीगुडा १५
मिनिटे उशिरा धावली पोटूल स्टेशनवरील सिग्नल बंद पडल्याने शनिवारी मनमाड-काचीगुडा पॅसेंजर पंधरा मिनिटे उशिराने धावली. पेपर वर्क करून पॅसेंजर सोडण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...