आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीत रेल्वे तिकीटाच्या विक्रीमध्ये ३३ लाखांची घट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षाच्या तुलनेत यंदा एका महिन्यात औरंगाबाद रेल्वेस्थानकामधील चालू तिकीट विक्रीतून रेल्वेला ३३ लाख रुपये कमी मिळाले. यामागचे नेमके कारण समजले नसल्याचे विभागीय व्यवस्थापक ए. के. सिन्हा यांनी शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) स्पष्ट केले. प्रवाशांच्या सोयीसाठी आरक्षण विभागात टोकन प्रणालीचा अवलंब करण्याचा विचार प्रशासन करीत असून आरक्षण विभाग अधिक गतिमान बनवण्याच्या दृष्टीने लवकरच बदल केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आैरंगाबाद रेल्वेस्थानकावर लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांसाठी संगणकीकृत आरक्षणाची सोय आहे. संगणकीकृत आरक्षणाची स्थिती चांगली असून चालू तिकीट विक्रीत मात्र मोठा फरक पडल्याचे सिन्हा यांनी स्पष्ट केले. खिडकीवरून तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली असून पर्यायाने उत्पन्नावरही याचा परिणाम झाला आहे. मागील वर्षी दिवाळीच्या एक महिन्याच्या कालावधीच्या तुलनेत यंदा खिडकीवरील तिकीट विक्रीतून ३३ लाख रुपये कमी मिळाले. मागील वर्षी दिवाळी ऑक्टोबरमध्ये होती. यंदा नोव्हेंबरमध्ये आल्याने उत्पन्नावर परिणाम झाला असावा, असा कयास प्रशासन लावत असले तरी ही बाब अनाकलनीय वाटत असल्याचे सिन्हा यांनी सांगितले. असे का घडले, यासंबंधी प्रवाशांची बाजू जाणून घेतली जाणार असल्याचे ते म्हणाले.

आरक्षणव्यवस्था गतिमान करणार : रेल्वेस्थानकावरीलसंगणकीकृत आरक्षण व्यवस्था अधिक गतिमान प्रवाशांभिमुख करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. आरक्षणाची स्थिती दर्शवणारा डिजिटल तक्ता प्रदर्शित केला जात आहे. शिवाय आरक्षणाची स्थिती सांगणारी उद््घोषणा प्रणाली सुरू केली जाईल. आरक्षणातील वेळेत बचत व्हावी कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रवाशांचे आरक्षण करता यावे, यासाठी टोकन प्रणालीचा अवलंब आैरंगाबाद रेल्वे आरक्षण विभागात करण्यासंबंधी प्रशासन गंभीर विचार करीत असल्याचे सिन्हा यांनी सांगितले. उपरोक्त व्यवस्थेमध्ये तत्काळ इतर आरक्षणाचा समावेश असेल.

अधिकाऱ्यांचीउलटतपासणी : आरक्षणकार्यालयाची दयनीय अवस्था बघून विभागीय व्यवस्थापकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. एका प्रवाशाचे आरक्षण करण्यास किती वेळ लागतो, यावर विभागीय वाणिज्य व्यवस्थापक मधुसूदन, मुख्य वाणिज्य निरीक्षक के. एन. बापूराव स्थानिक आरक्षण विभागाचे पर्यवेक्षक यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर दोन पाळ्यांमध्ये नऊ कर्मचारी आरक्षण विभागात काम करीत असून प्रत्येकी चार कर्मचारी दोन पाळ्यांमध्ये काम करीत असल्याचे सांगण्यात आले.

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक ए. के. सिन्हा यांनी शुक्रवारी आैरंगाबाद रेल्वेस्थानकासह आरक्षण कार्यालय आणि आरक्षण व्यवस्थेची पाहणी केली.

अधिकाऱ्याचा झाला पोपट
एकाप्रवाशाचे आरक्षण संबंधित कारकुनाकडून किती मिनिटांत व्हायला हवे, असा प्रश्न सिन्हा यांनी विभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक मधुसूदन यांना विचारला असता त्यांनी दहा मिनिटे सांगितले. यावर सिन्हा प्रचंड चिडले. आरक्षणासंबंधीचे नियम वाचा मला सायंकाळपर्यंत सांगा, असे फर्मान त्यांनी सोडले. एका प्रवाशाचे आरक्षण केवळ दोन मिनिटांत व्हावे, असा नियम असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. आरक्षण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील पाय पुसण्याची मॅट बदलण्याचे आदेशही त्यांनी या वेळी दिले.

प्रवाशांनी सहकार्य करावे
आरक्षणासाठीयेणाऱ्या प्रवाशांनी डिजिटल बोर्ड अथवा कार्यालयात लावलेल्या मशीनवर आपल्याला हव्या असलेल्या आरक्षणाची खात्री करून घ्यावी. हवे असलेले आरक्षण मिळत नसेल तर पर्यायी आरक्षणाचा आधीच विचार करावा. आरक्षण खिडकीवर येऊन पर्याय देऊ नये. यामुळे जास्त वेळ खर्च होतो पर्यायाने इतर प्रवाशांना तिष्ठत बसावे लागते. याची काळजी सर्वांनी घेतली तर वेळेची बचत होऊन अधिकाधिक प्रवाशांना सेवा देता येईल, असे आवाहन सिन्हा यांनी केले.