आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एजंटाच्या सुटकेसाठी सात हजारांची लाच घेताना रेल्वे पोलिसाला पकडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- रेल्वेच्या तत्काळ तिकिटाचा काळाबाजार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या एजंटाच्या सुटकेसाठी सात हजार रुपयांची लाच घेणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलातील कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहाथ पकडले. मोगल सिफल बेग बाबू बेग (४०, रा. अबरार कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. १६ एप्रिल २०१७ रोजी तक्रारदार ट्रॅव्हल एजंट तत्काळ तिकिटे विकत होता. 

निरीक्षक शर्मा कॉन्स्टेबल बेग यांनी त्याला पकडून रेल्वे सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. एजंट जामिनावर सुटल्याने बेग याने त्याला गाठून तुला तपासात मदत करतो. त्यासाठी ११ हजार रुपये लाच द्यावी लागेल, असे सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने त्या वेळी हजार रुपये दिले. मे रोजी बेग याने पुन्हा तक्रारदाराला सात हजार रुपयांची मागणी केली. परंतु लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. मे रोजी बेग याने तक्रारदाराला सात हजार रुपये घेऊन बोलावले. दुपारी १.३० वाजता बेग रेल्वेस्टेशनच्या प्रवेशद्वारावर पैसे घेत असतानाच पोलिस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, उपअधीक्षक हेमंत सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रमोद पाटील, वैशाली पवार, गणेश पंडुरे, हरिभाऊ कुऱ्हे, विजय बाम्हंदे, रवी देशमुख, रवींद्र अंबेकर, बाळासाहेब राठोड, संदीप चिंचोले यांनी त्यास पकडले. 
बातम्या आणखी आहेत...