आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेप्रश्नी वर्मा यांनी लिहिले रक्ताने पत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - मराठवाड्यातील रेल्वेप्रश्न सोडवण्यासाठी मराठवाडा रेल्वे विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष आेमप्रकाश वर्मा यांनी शुक्रवारी (११ डिसेंबर) पत्रकार परिषदेतच आपल्या रक्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना पत्र लिहिले. यानंतरही ठोस आश्वासन मिळाले नाही तर ३० जानेवारीला नवी दिल्लीच्या जंतरमंतरवर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली.

रेल्वेप्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी लोकप्रतिनिधींमध्ये निराशा आहे. आपण विभागीय आयुक्तालयासमोर उपोषणाला बसलो असता एकाही लोकप्रतिनिधीने भेट घेतली नाही, वैजापूर पैठण तालुक्यातूनही कोणी पुढाकार घेतला जात नाही, अशी खंत वर्मा यांनी व्यक्त केली.
रेल्वेच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी रक्ताने पत्र लिहिण्याची घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी दुपारी शहानूरमियां दर्गा परिसरातील लॅबमधून आपले रक्त काढून आणले आणि क्रांती चौक येथील हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पंतप्रधान रेल्वेमंत्र्यांना महत्त्वाच्या तीन समस्या पत्रावर लिहून पाठवल्या आहेत.
शिर्डी संस्थान शताब्दी वर्ष २०१८ मध्ये साजरे करीत असल्याने रोटेगाव ते पुणतांबा या कॉडलाइनच्या कामास प्रारंभ करावा, मराठवाडा विभागास दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबादमधून काढून मध्य रेल्वे मुंबईशी जोडण्यात यावे, दौलताबाद ते चाळीसगाव या रेल्वेमार्गाचे काम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुचवल्याप्रमाणे राष्ट्रीय महामार्गासोबत करण्यात यावे या त्या तीन मागण्या आहेत.

वर्मा यांचे वय ७० इतके असून काही महिन्यांपूर्वीच त्यांना मोठ्या आजाराला समोरे जावे लागले होते. तरीही त्यांनी आपल्या रक्ताच्या स्वाक्षरीने पत्र लिहिले. पत्रकार परिषदेला स्वातंत्र्यसेनानी ताराबाई लड्डा, मराठवाडा जनता विकास परिषदेचे डॉ. शरद अदवंत, महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे सुगम कुलकर्णी, वैजापूर व्यापारी संघटनेचे पवन जैन, सुधाकर चव्हाण आदींची उपस्थिती होती.

डबे वाढवले
दादरते जालना धावणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसला अतिरिक्त डबे लावण्याची मागणी वर्मा यांनी केली होती. मध्य रेल्वेने ही मागणी पूर्ण करत डब्यांची संख्या अकरावरून तेरा केली आहे. सेकंड सीटिंग श्रेणीचे आणखी दोन डबे एप्रिल २०१६ पासून वाढवले जाणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...