आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातानंतर रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले; प्रवाशांचे हाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मंगला एक्स्प्रेसला अपघात झाल्यामुळे औरंगाबादहून जाणार्‍या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बिघडले. 16, 17 नोव्हेंबरला प्रवाशांची ससेहोलपट झाली. नंदीग्राम, देवगिरी एक्स्प्रेस तसेच दौंड-नांदेड पॅसेंजरच्या प्रवाशांना याचा फटका बसला.

अपघातामुळे औरंगाबादहून मुंबई व नांदेडकडे जाणार्‍या रेल्वेंच्या मार्गात बदल करण्यात आला. नागपूर-मुंबई नंदीग्राम, सिकंदराबाद-मुंबई देवगिरी एक्स्प्रेस या गाड्या मनमाड, कोपरगाव, नगर, पुणे व कल्याणमार्गे सीएसटीपर्यंत नेण्यात आल्या. मुंबई-नागपूर व मुंबई-सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेस कल्याण, लोणावळा, खंडाळा, पुणे, दौंड, नगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाडमार्गे औरंगाबादला आली. नंदीग्राम नेहमी रात्री 11.45 वाजता औरंगाबादला येते, परंतु मार्गात बदल केल्याने ही गाडी 16 नोव्हेंबरला सकाळी 8.30 वाजता पोहोचली. मुंबई-सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेस शनिवारी पहाटे 4 वाजता येणे अपेक्षित असताना ती सकाळी 10.40 वाजता दाखल झाली. 17 नोव्हेंबरला रात्री जनशताब्दी एक्स्प्रेस 9.30 वाजता आली. नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस रविवारी रद्द करण्यात आली. दौंड-नांदेड पॅसेंजर शनिवारी रात्री 9.30 ऐवजी रविवारी सकाळी 11 वाजता आली. मुंबईला जाणार्‍या व येणार्‍या रेल्वेंनाच एक दिवस अडचण झाल्याचे व्यवस्थापक अशोक निकम यांनी सांगितले.