आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच तालुक्यांत वार्षिक सरासरीच्या कमी पाऊस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यात सर्व मोठी धरणे भरली असताना औरंगाबाद जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पात मात्र अजूनही पुरेसा पाणीसाठा झाला नाही. जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पात केवळ ३३ टक्के पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद वगळता मराठवाड्यात सर्व मध्यम आणि लघु प्रकल्पात ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे.
मराठवाड्यात यावर्षी ८५८ मिमी पाऊस झाला आहे. त्या तुलनेत औरंगाबाद जिल्ह्यात सरासरी ६१० मिमी पाऊस झाला आहे. पैठण, गंगापूर, कन्नड, खुलताबाद तालुक्यात वार्षिक सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातीलकेवळ प्रकल्प भरले : मराठवाड्यात७५ मध्यम प्रकल्पात सध्या ८१ टक्के पाणीसाठा आहे. मात्र औरंगाबाद जिल्ह्यात हे प्रमाण केवळ ३३ टक्के आहे. जिल्ह्यात १६ मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी केवळ पाच प्रकल्प भरले आहेत. लाहुकी, अंबाडी, गडदगड, पूर्णा नेवपूर आणि कोल्ही हे प्रकल्प भरले आहेत. १६ प्रकल्पाची एकूण क्षमता २०५ दलघमी असताना प्रकल्पात ६७ दलघमी पाणीसाठा आहे. हे प्रमाण ३३ टक्के इतके आहे. गेल्या वर्षी हाच पाणीसाठा ६५ दलघमी इतका होता, तर ३२ टक्के धरणात पाणीसाठा झाला होता. २०१४ मध्ये याच दिवशी पाणीसाठा ५६ दलघमी आणि हे प्रमाण २८ टक्के इतके होते. सुखना धरणात २७ टक्के, गिरजा टक्के, वाकोद ००, खेळणा ४९, अजिंठा-अंधारी ५५, अंजना-पळशी १९, शिवना-टाकळी २५, टेंभापुरी ९, ढेकू ५३, बोरदहेगाव टक्के पाणीसाठा झाला आहे.

लघु प्रकल्पात ५३ टक्के पाणीसाठा
मराठवाड्यात ७३२ लघुप्रकल्पात ८३ टक्के पाणीसाठा आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ९० लघु प्रकल्पात ५३ टक्के पाणी आहे. या ९० लघु प्रकल्पांची क्षमता १८४ दलघमी असताना त्यात ९७ दलघमी पाणीसाठा झाला आहे. इतर जिल्ह्यांत हे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. २०१५ मध्ये लघु प्रकल्पांत ४१ टक्के तर २०१४ मध्ये ३४ टक्के पाणीसाठा होता.

बातम्या आणखी आहेत...