आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवसांच्या खंडानंतर पुन्हा पुनरागमन, औरंगाबादमध्ये पावसाची दमदार हजेरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- हवामानशास्त्र खात्यासह या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार काल (सोमवारी) रात्री 10 वाजेच्या सुमारास पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली. हा पावसाच्या तुरळक सरी रात्री उशीरापर्यंत बरसतच होत्या. दोन दिवसांपुर्वी (शुक्रवारी) झालेल्या दमदार पावासाने मराठवाड्यात अतिवृष्टी नोंद झाली होती. हा पाऊस 12 ते 13 सप्टेंबरपर्यंत मुक्कामी राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. 
 
शुक्रवारी झाली होती अतिवृष्टी...
देशभरात नैऋत्य मान्सूनच्या सहा सिस्टिम तयार झाल्याने शुक्रवारी महाराष्ट्रासह देशातील बहुतांश भागात पाऊस झाला होता. या पावसाने मराठवाड्यातील २० मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. विदर्भात ४ ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात १४ ठिकाणी अतिवृष्टी झाली. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत शुक्रवारी पाऊस झाला. उस्मानाबाद, बीड, जालना, औरंगाबाद जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता. 

राज्यात यंदा मान्सूनची चाल विस्मयकारक राहिली आहे. हमखास पावसाचा विभाग म्हणून ओळख असलेल्या विदर्भाला यंदा मान्सूनने गुंगारा दिला आहे. शुक्रवारपर्यंत विदर्भात पावसाने २९ टक्क्यांची तर मराठवाड्यात ९ टक्के तूट नोंदवली. नैऋत्य मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने विदर्भ व मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे. 

विदर्भात २७ टक्के, मराठवाड्यात १० टक्के तूट
एकजून ते पाच सप्टेंबर २०१७ या काळात झालेल्या पावसानुसार विदर्भात सर्वाधिक २७ टक्के तूट नोंदवण्यात आली.

सर्वात कमी पावसाचे जिल्हे
विदर्भातीलसर्वच जिल्ह्यांत पावसाने तूट नोंदवली आहे. अातापर्यंत अपेक्षित पावसाच्या तुलनेत यवतमाळ जिल्ह्यात ३७ टक्के कमी पाऊस झाला आहे. अकोला २५, अमरावती ३४, भंडारा २८, बुलडाणा ११, चंद्रपूर गोंदिया ३६, वाशीम ३०, वर्धा २२, गडचिरोली २५ नागपूर जिल्ह्यात टक्के कमी पाऊस झाला.

१२ ते १३ तारखेपर्यंत पाऊस
उस्मानाबाद, नांदेड, लातूर भागात सप्टेंबरपर्यंत तर मराठवाड्याच्या उर्वरित भागांत त्यानंतर पाऊस होईल. हा पाऊस १२ ते १३ सप्टेंबर पर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे. 
- श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम खगोल अंतराळ संशोधन केंद्र
बातम्या आणखी आहेत...