आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद जिल्ह्यात अवकाळी वादळी पाऊस, वैजापूर तालुक्यात 20 मिनिटे गारपीट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबादसह गंगापूर, पैठण आणि वैजापूरला शुक्रवारी अवकाळी पावसाने झोडपले. सायंकाळी ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह सरी बरसल्या. वैजापूर तालुक्यात वादळी वा-यांसह सुमारे २० मिनिटे गारपीट झाली. या गारपिटीमुळे काही जनावरे जखमी झाली. सुपारीएवढ्या गारांच्या माराने हाती आलेल्या रब्बी पिकांची नासाडी झाली
काही ठिकाणी गारांचा अर्धा ते पाऊण इंचांचा थर साचला. वादळामुळे विजेचे खांब कोसळून तारा तुटल्याने वीजपुरवठाही खंडित झाला. पैठणमध्ये या अवकाळी पावासामुळे वारक-यांची धांदल उडाली.