आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद शहरात दिवसभर भिजपाऊस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मागील दोन दिवसांपासून शहरात रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे सर्वत्र आल्हाददायक वातावरण झाले आहे. मंगळवारी दिवसभर भिजपाऊस झाला. या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी शहरातील अनेकांची पावले खुलताबाद, म्हैसमाळच्या दिशेने वळत होती.

भिजपावसामुळे अनेक ठिकाणच्या रस्त्यावर चिखलमिश्रित पाणी साचले होते. वाहनधारकांना यातून मार्ग काढताना कसरत करावी लागली. सोमवारी रात्री 8.30 ते मंगळवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत 19.4 मिमी तर सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 11 मि.मी. पाऊस झाल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने तापमान 25 अशांपर्यंत खाली आले. 15 दिवसांपूर्वी ते 30 अंशांवर होते. 5 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात 334.49 टक्के पाऊस होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात 169.21 टक्केच पाऊस झाला. यामुळे खरिपातील पिके तग धरून आहेत.

चाकरमान्यांचे हाल
शहरातील रस्त्यात मोठे खड्डे पडले आहेत. याचबरोबर सखल भागात पाणी साचल्याने वाहनचालकांची अडचण होत आहे. खड्ड्यात वाहन अडकल्याने किरकोळ अपघातही घडत आहेत. गुंठेवारी भागात रोड नसल्याने सर्वत्र चिखल झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.