आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूर, सोयगाव तालुके वादळी पावसाने झोडपले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर/सोयगाव - वैजापूर, सोयगाव तालुक्यांना सोमवारी सायंकाळी जोरदार वादळी पावसाने झोडपले. विजेच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे परिसरातील रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. आंब्यालाही फटका बसला.

वैजापूर शहरातही रात्री साडेआठ वाजता पाऊस झाला. लोणी खुर्द परिसरात तलवाडा, वाकला, चिकटगाव, भादली, पाराळा, टुणकी, आंतलगाव, बाभूळतेल, नायगव्हाण, पिंपरखेडा, चिंचखेड्यासह खरज येथे विजेच्या कडकडाटासह अर्धा तास पाऊस झाला. सोयगाव परिसरात सोमवारी रात्री दहाच्या सुमारास वादळी वार्‍यासह तासभर पाऊस झाला. त्यातच वीज गेल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. अजिंठा परिसरातही रात्री अकराच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ परिसरातही पाऊस पडला.

राज्यात तुरळक सरींची शक्यता
पुणे - येत्या चोवीस तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक सरी कोसळण्याचा अंदाज आहे. गेल्या 24 तासांत अनेक ठिकाणी हलक्या सरींचीही नोंद झाली. पुणे वेधशाळेनुसार, लक्षद्वीप ते गुजरातच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत आहे. मराठवाड्यातील तापमान 30 ते 35 अंश सेल्सियसच्या दरम्यान होते.