आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परतीचा मान्सून - औरंगाबद शहरात आणखी पाच दिवस पाऊस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नऊ सप्टेंबरपासून गायब झालेल्या पावसाचे वेगवान वाऱ्यासह ऑक्टोबर रोजी सव्वीस दिवसांच्या खंडानंतर आगमन झाले. चिकलठाणा वेधशाळेत एक मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हा परतीचा मान्सून असून आणखी पाच दिवस म्हणजे दहा ऑक्टोबरपर्यंत औरंगाबादेत अधूनमधून जोरदार सरी पडणार आहेत. त्यानंतर थंडी राहणार असल्याचे हवामानतज्ज्ञांनी सांगितले आहे.
गेल्या आठ दिवसांपासून कमालीचा उष्मा वाढला. दोन वर्षांच्या तुलनेत तीन अंश सेल्सियसने तापमान वाढले. उकाड्याने लोक हैराण झाले होते. त्यांना रविवारी दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत पडलेल्या पावसाच्या सरींनी दिलासा मिळाला. तापमान एका अंशाने कमी झाले. गारखेडा, सातारा, रेल्वेस्टेशन परिसरात जोरदारी सरी कोसळल्या. इतर भागांत त्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे.
रविवारी दुपारनंतर शहरात परतीच्या पावसाने हजेरी लावली. पाऊस काही भागातच पडला.
डासांकडे लक्ष द्या
^ढगाळवातावरणात थंड पदार्थ पिणे टाळावे, थंड हवेत फार काळ फिरू नये, बाहेर पडताना तोंडाला, कानांना झाकेल असा स्कार्फ, मफलर बांधावा. याशिवाय पाण्याची वाफ घ्यावी. या वातावरणाच्या डासांकडे लक्ष द्यावे. डॉ.मंगला बोरकर, घाटी
आणखी पाऊस होईल; पण...
औरंगाबादसह मराठवाड्यात १० ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडणार आहे; पण तो सर्वत्र पडेलच याची काही खात्री नाही, असे डॉ. साबळे, जायभाये चिकलठाणा वेधशाळेचे शास्त्रज्ञ पंढरीनाथ साळवे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, काही ठिकाणी दमदार सरी कोसळणार आहेत.
शेतीचे काय?
महिनाभरापासून पाऊस नसल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण होते. खरिपाची िपके तगून राहण्यासाठी काही सरी तरी पडाव्यात, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. आज जिल्ह्यात झालेल्या पावसाने पिकांना काही प्रमाणात मदत होणार आहे. मात्र, रब्बी पेरणीही खोळंबली आहे. ती सुरू होण्यासाठी ४० ते ६० मिमी पाऊस होणे गरजेचे आहे.
तज्ज्ञांचा अंदाज खरा ठरला
ऑक्टोबर रोजी शहरात पाऊस पडणार असा अंदाज सप्टेंबर रोजी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण हवामान विभागाचे मुख्य समन्वयक प्रल्हाद जायभाये यांनी वर्तवला होता. तो "दिव्य मराठी'ने प्रसिद्ध केला होता.
पंधरा दिवसांचे असे होते तापमान
गेल्या चार वर्षांत २० सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंत पारा ३३ अंशांवर कधी पोहोचला नाही. तो यंदा ३५.४ अंश सेल्सियसवर पोहोचला. २७ सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंत कमाल तापमान ३४ अंशांवर स्थिर होते. ऑक्टोबर रोजी ते ३५.४ अंशांवर गेले. ऑक्टोबर रोजी पावसाचे आगमन ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमान एक अंशाने घसरून ते ३४.४ अंशांवर आले.
----------------------