आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालुकानिहाय झालेली लागवड, पावसाच्या पुनरागमनाने पिकांना काहीसा दिलासा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - जूनच्याप्रारंभी झालेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यात तीन लाख ८० हजार हेक्टरवर पिकांची लागवड झाली होती. मात्र, त्यानंतर पावसाने तब्बल एक महिना पावसाने दडी मारल्यामुळे पिकांनी माना टाकायला सुरुवात केली होती. लागवड क्षेत्रापैकी ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनचा वापर केल्याने या पिकांना थोड्याफार प्रमाणात दिलासा होता. दरम्यान, मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे लाख हेक्टरीवरील पिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, खडकाळ जमीन असलेल्या ३० ते ३२ हजार हेक्टरवरील पिके वाया गेली आहेत.

या वर्षी पावसाने दमदार सुरुवात केल्यामुळे पहिल्याच पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी, सोयाबीन, मका, हायब्रीड ज्वारी आदी पिकांची लागवड केली होती. मात्र, दोन ते तीन पावसानंतर तब्बल एक महिना उघडीप राहिली. यामध्ये पांढरे सोने समजले जाणारे कपाशी हे पीक नुकतेच कोंंबात आले होते, तर काही शेतकऱ्यांनी मुबलक पाणीसाठा असल्याने ठिबकच्या भरवशावर कपाशीची लागवड केली होती. तसेच काही शेतकऱ्यांनी ही पिके जगविण्यासाठी नवीन ठिबक सिंचनही खरेदी केले होते. शेतात ठिबक सिंचन करण्यासाठी एकरी पाच हजार रुपयांचा खर्च येत असतो. दुष्काळात हा खर्च शेतकऱ्यांनी झेलला. दरम्यान, जून महिन्यात मृग नक्षत्रात सुरू झालेल्या पावसाने एक महिनाभर दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली होती. यामध्ये खडकाळ जमीन असलेल्या ३० ते ३२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ज्या जमीनी कसदार होत्या. त्यामध्ये थोड्या प्रमाणात ओलावा राहिल्यामुळे पिके तग धरून होती. अजून आठवडाभर पाऊस आला नसता तर सर्वच ठिकाणी दुबार पेरणीची परिस्थिती आली असती.

दोन दिवसांच्या पावसाने पिकांना दिलासा
जिल्ह्यातीलकपाशी, सोयाबीन, मका, ज्वारी आदी पिकांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे. पिकांची व्यवस्थित वाढ होण्यासाठी कोळपणी, खुरपणीकडे लक्ष द्यावे. काही अडचणी आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा. आनंदगंजेवार, कृषीविस्तार अधिकारी, जालना.

३२ हजार हेक्टरवरील पिके करपली
पावसानेतब्बल महिनाभर उघडीप दिल्यामुळे मुरमाड खडकाळ असलेल्या जमिनीत दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. काळी असलेल्या जमिनीत थोड्याफार प्रमाणात ओलावा टिकून होता. यामुळे काहीअंशी पिकांना जीवदान होते. तसेच काही शेतकऱ्यांनी फवारणी तसेच तांब्याने पाणी घालून मोठ्या प्रमाणात मेहनत घेतल्यामुळे ही पिके जगली.

जिल्ह्यात पाऊस
जिल्ह्यातबुधवारी दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत ठिकठिकाणी पाऊस झाला. या पावसामुळे पिकांना वाचवण्याच्या काळजीत असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

पावसाचा हा फायदा
पावसाअभावीखरिपातील पिकांनी माना टाकायला सुरुवात केली होती. मात्र, मंगळवारपासून जिल्ह्यात पावसाने पुनरागमन केले असून त्यामुळे या पिकांना दिलासा मिळाला आहे. शिवाय पिकांमध्ये थोड्याफार प्रमाणात ताणही पडल्यामुळे पिकांची वाढ होण्यास चांगली मदत होणार आहे.

भोकरदन ५४७०० हेक्टर
घनसावंगी ४८४०० हेक्टर
मंठा ३८२०० हेक्टर
जाफराबाद ३७६०० हेक्टर
अंबड ३६१०० हेक्टर
बदनापूर २८५०० हेक्टर
परतूर २२५०० हेक्टर
एकूणलाख ८० हजार हेक्टर
टक्केवारी ५५ टक्के