आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादसह परिसरात जोरदार पाऊस, दोन दिवसांत चांगल्या पावसाची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबादेत रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मान्सूनचा पहिला पाऊस बरसला. शहरासह परिसरात सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस सुरू होता. चिकलठाणा वेधशाळेनुसार रात्री साडेअकरापर्यंत शहरात ७ मि. मी. पावसाची नोंद झाली. शिवाय शहरातील दिवसाचे तापमान ३९ वरून २९ अंशावर तर किमान तापमानही २५ वरून २० अंशावर आले.

दरम्यान, राज्यात विदर्भाच्या दिशेने प्रवेश केलेल्या नैऋत्य मोसमी पावसाने आपली आगेकूच रविवारी कायम ठेवली. मान्सून कोकणच्या दक्षिण भागात, मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात कार्यरत झाला. येत्या ४८ तासांत कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

मान्सूनचे शनिवारी राज्यात विदर्भमार्गे आगमन झाले. आता संपूर्ण गोवा मान्सूनने व्यापला. दक्षिण कोकण व्यापून अरबी समुद्रातून पाऊस पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे, असे आयएमडीने म्हटले आहे. येत्या ४८ तासांत कोकण, विदर्भ तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची तर बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...