आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, तीन जनावरे दगावली; जिल्हाभरात दमदार पाऊस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्ह्यातील पैठण, सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, कन्नड, सोयगाव आदी तालुक्यांसह बहुतांश ठिकाणी एक दिवसाच्या उघडिपीनंतर पुन्हा पावसाने मेघगर्जनेसह शुक्रवारी दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात वीज अंगावर कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून तीन जनावरे दगावली आहेत.

पैठण तालुक्यातील बिडकीन, निलजगाव, बंगलातांडा, बन्नी तांडा, नांदलगाव, चितेगाव, पैठणखेडा, रांजणगाव आदी परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सायंकाळी ७.३० वाजेदरम्यान सुरू झाला. सिल्लोडमध्ये विजांच्या कडकडाटासह सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात होऊन दीड तास दमदार बरसला. फुलंब्री परिसरामध्येदेखील सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह १५ मिनिटे दमदार पाऊस होऊन रिमझिम सुरू होती. कन्नड, सोयगाव परिसरातही आतापर्यंत चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी कापूस, तूर, मका या पिकांच्या लागवडीस सुरुवात केली.

चिंचोलीत गाय दगावली
चिंचोली लिंबाजी येथे शुक्रवारी ३.४५ वाजता वीज कोसळून गाय ठार झाली. विनायक पवारांच्या मालकीची ती गाय होती. जगन्नाथ पवार, पापालाल जैस्वाल, कडुबा वाढेकर, संदीप पवार आदींनी नुकसान भरपाईची मागणी केली.

वीज कोसळली
पिशोर - कपाशीची लागवड करत असताना शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळून ठार झाल्याची घटना कन्नड तालुक्यातील पिशोर येथे शुक्रवारी घडली. अप्पाराव नारायण जाधव (५५) असे शेतकऱ्याचे नाव आहे. पिशोर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी रतिभूषण गडवाल यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

दोन जनावरे दगावली
खुलताबाद तालुक्याती भडजी येथे सांयकाळी सात वाजता अप्पाराव गिरजाराम वाकळे यांच्या मालकीच्या गोठ्यातील जनावरांवर वीज कोसऴून एक म्हैस दगावली. खिर्डी येथेदेखील मोती बन गोसावी यांची घराशेजारील गोठ्यातील कालवड वीज कोसळून दगावली. खुलताबाद शहरासह तालुक्यात पहिलाच जोराचा पाऊस झाला.

पुढे वाचा, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात मुसळधार, भोकरदन तालुक्यात युवक वाहून गेला...
बातम्या आणखी आहेत...