आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: औरंगाबादकरांना पावसाने झोडपले, अशी आहे राज्‍यातील स्‍थिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विद्यापीठ परिसरातील लेणीवरील धबधबा सुरू झाला आहे. - Divya Marathi
विद्यापीठ परिसरातील लेणीवरील धबधबा सुरू झाला आहे.
औरंगाबाद- औरंगाबादला मंगळवारी दुपारी पावसाने जोरदार झोडपले. गेल्या दोन दिवसांपासून आकाशात दाटून येणारे ढग रिमझिम बरसून हुलकावणी देत होते. मात्र, मंगळवारी 11.45 पासून पावसाला सुरुवात झाली. दुपारी 1.30 च्‍या दरम्‍यान त्‍याने चांगलाच दोर धरला.
बाजार परिसरात धावपळ
औरंगपूरा, पैठणगेट भागात ईदच्‍या खरेदीची धामधुम आहे. मात्र पावसाने दोर धरल्‍याने ग्राहकांची एकच धावपळ उडाली. ऐरवी पावसात चिंब भिजून आनंद लुटणा-या औरंगाबादकरांना या पावसाने मात्र, उड्डाणपुलाच्‍या छताचा सहारा घेण्‍यात भाग पाडले. सुमारे एक तास पाऊणतास पावसाचा जोर कायम होता.
छायाचित्र - राहुल रणसुभे
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, मुंबई पुण्‍यासह राज्‍यातील पावसाची स्‍थिती..
पुढील स्‍लाइडवर पाहा, व्‍हिडियो..
बातम्या आणखी आहेत...