आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला पावसाची वर्दी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- रविवारी मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला शहरात रोहिणी नक्षत्राने वर्दी दिली. रात्री ११.३० वाजेपर्यंत ६.४ मिमी पावसाची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. सोमवारी सायंकाळी ६.४५ वाजेला मृग नक्षत्रास प्रारंभ होत आहे. पाच वर्षांनंतर या नक्षत्रात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचे भाकीत ज्योतिषतज्ज्ञांनी वर्तवले आहे.
हवेचा वेग वाढला
मान्सून उष्ण वारे वाहत आहेत. रविवारी दुपारनंतर हवेचा वेग प्रचंड वाढला होता. यामुळे आदित्यनगरमध्ये वृक्ष उन्मळून पडला. तर वीज वाहिन्यांचे एकमेकास घर्षण होऊन चिकलठाणा, मुकुंदवाडी, जयभवानीनगर, गारखेडा परिसर, सिडको, हर्सूल, सातारा परिसर आदी बहुतांश भागात वीजपुरवठा दुपारी वाजेपासून खंडित झाला होता. गोलवाडी, सातारा चिकलठाणा भागात विद्युत वाहिन्या तुटल्या होत्या.
पूर्व नक्षत्रात चांगला पाऊस
मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा आणि पूर्वा या पूर्व नक्षत्रांत चांगला पाऊस पडणार आहे. उत्तरा, हस्त, चित्र आणि स्वाती या उत्तरार्धातील नक्षत्रांत कमी पाऊस पडेल. मध्य नक्षत्रात चांगला पाऊस पडणार असल्याने पिकांची स्थिती चांगली राहील, अशी माहिती ज्योतिषतज्ज्ञ जयंत धोंगडे राजेंद्र जोशी यांनी दिली.
मृगनक्षत्र
- इंद्रमंडल नावाचा योग आहे. कोल्हा वाहन आहे. शुक्र जल नाडीत आहे. रवी शनीची प्रतियुती मंगळ-बुध युती असल्यामुळे उष्णता कमीअधिक प्रमाणात राहील. पर्जन्यमान समाधानकारक होईल. ते १० आणि १८ ते २० जून रोजी पाऊस पडेल. मान्सूनची सुरुवात आणि शेवट थोडासा असमाधानकारक असला तरी मध्य नक्षत्रात भरपूर पाऊस पडेल.
अनंत पांडव गुरुजी, ज्योतिष तज्ज्ञ.
ज्योतिष तज्ज्ञांनी व्यक्त केले भाकित
- यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस पडणार
- मान्सूनची सुरुवात आणि शेवटही चांगला राहील