आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादळी पावसाची आज शक्यता, शुक्रवारी सायंकाळी हलक्या स्वरूपाचा पाऊस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद | तापमानात अनपेक्षित चढउतार होत आहेत. त्यामुळे वातावरणात बदल होत असून काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. शहर परिसरात उद्या शनिवारी वादळी पावसाची शक्यता आहे.

शुक्रवारी दिवसभर सूर्य तळपला. कमाल तापमान ३८.२ तर किमान २४.० अंश सेल्सियस होते. सायंकाळी वाजेनंतर हवामानात बदल होऊन पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. हवेचा वेग प्रचंड वाढला होता. ५.३० ते या दरम्यान प्रतिघंटा २३ किमी वेगाने वारे वाहत होते. या वादळामुळे काही काळ जनजीवन ठप्प झाले होते. सिडको, चिकलठाणा, हनुमाननगर, गारखेडा परिसर आदी ठिकाणी वीजपुरवठा थोड्या वेळासाठी बंद पडला होता. वादळाने सर्वत्र धुळीचे लोट उठल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांची त्रेधा उडाली. शनिवारीही वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रस्ता भिजून पाण्याचे ओघळ वाहत होते. वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

याबाबत संतोष माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यांचे वडील माजी आमदार अण्णासाहेब माने यांना विचारले असता त्यांनी संतोषच्या गाडीवर काकासाहेब नावाचा कोणीही चालक नसल्याचे आवर्जून सांगितले.

मध्य प्रदेशातून हे कट्टे येतात महाराष्ट्रात दहा ते बारा हजार रुपयांना विकले जातात. साधारणत: ग्रामीण भागात याचा व्यवहार चालतो. एका कट्ट्यासोबत तीन काडतुसे मिळतात. नंतर मागवल्यास एका काडतुसाची किंमत पाचशे रुपये असते.