आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तासभरात औरंगाबाद ओलेचिंब; मान्सूस बुधवारपर्यंत राज्यात धडकणार?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

थिरुवानंतपुरम/औरंगाबाद- केरळात शनिवारी दाखल झालेल्या मान्सूनची वाटचाल निर्धोक सुरू आहे. नैर्ऋत्य अरबी समुद्र, कर्नाटक व तामिळनाडूच्या दिशेने वाटचालीस स्थिती अनुकूल असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

केरळपाठोपाठ चार दिवसांत म्हणजे बुधवारपर्यंत मान्सून राज्यात धडकेल, असा अंदाज आहे. त्यासाठी सध्या तरी स्थिती अनुकूल आहे. येत्या 48 तासांत तो दक्षिण आंध्र प्रदेशासह बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचेल, असे सूत्रांनी म्हटले आहे. कर्नाटक, केरळ किनार्‍यावर निर्माण झालेल्या मोसमी वार्‍याच्या द्रोणीय स्थितीची दिशा बंगालच्या उपसागराकडे आहे. यामुळे मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा व आंध्रमध्ये पावसाची शक्यता आहे.

तासभर पाऊस, शहर ओलेचिंब
औरंगाबाद शहरात बहुतांश भागांत रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत जोरदार पावसाने हजेरी लावली. सखल भागांत पाण्याची तळी साचली होती. अचानक आलेल्या या पावसामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.

39.2 अंश सेल्सियस एवढे कमाल तापमान रविवारी शहरात.

वाळूज अंधारात

वाळूज भागातही रात्री पाऊस झाला. यामुळे परिसरात वीज खंडित झाल्याने अंधार पसरला होता.

जोर वाढणार
मान्सूनपूर्व पावसाचा जोर यापुढे आणखी वाढण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे.