आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rain In Marathawada News In Marathi, Divya Marathi

रिमझिमीने सकळजन सुखावले; दोन दिवसांत 33.4 मिमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- यंदाच्या मान्सूनमध्ये प्रथमच दोन दिवस पावसाने हजेरी लावली. सतत रिमझिम होत असलेल्या पावसामुळे बुधवारी औरंगाबादकरांना सूर्यदर्शन झाले नाही. चिकलठाणा वेधशाळेत सोमवारी रात्री साडेआठ ते बुधवारी रात्री साडेअकरा वाजेपर्यंत 33.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. येत्या 48 तासांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वेधशाळेच्या हवाल्याने वर्तवली आहे.

मंगळवारी रात्री सायंकाळपासूनच हलक्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. बुधवारी दिवसभर अशीच स्थिती राहिल्याने लोक सुखावले. हा पाऊस खरिपाच्या पिकांसाठी उपयुक्त असून शेतक-यांनी पाणी जिरवण्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक जनार्दन जाधव यांनी केले आहे. हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी अल निनोचा प्रभाव ओसरल्याने यापुढे जोरदार पाऊस होणार असल्याचे सांगितले.

गॅस्ट्रो, डेंग्यूचा धोका
पावसामुळे पिण्याचे पाणी दूषित होऊ शकते. गॅस्ट्रोचा धोका वाढतो. म्हणून उकळून गार केलेले पाणी प्यावे. डास वाढल्याने डेंग्यूही होऊ शकतो. त्यासाठी उपाययोजना करावी. अ‍ॅसिडिटी वाढवणारे पदार्थ टाळावेत.
डॉ. जी. एम. गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक