आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात अवकाळीमुळे कहीं खुशी, कहीं गम !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड - तालुक्यात वर्ष २०१२ मध्ये पडलेला दुष्काळ, मागील वर्षी झालेली गारपीट आणि यंदाचा पुन्हा दुष्काळ त्यातच पडत असलेल्या पावसाने उरलेसुरले पीकही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. भविष्यात गारपीट होण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंतित आहेत.
तीन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण होते. बुधवारी पहाटे जोरदार पाऊस झाला. या पावसाने गहू, मका, कापूस, कांदा, कांदा बीजवाई या प्रमुख पिकांसह भाजीपाला फळबागांचे मोठे नुकसान होत आहे. महिनाभरापासून सुरू झालेल्या थंडीमुळे यंदाचा रब्बी हंगाम तरी चांगला राहील, अशी आशा ठेवून या आधी तीन वेळेस नैसर्गिक आपत्तीमुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांनी यंदा चौथ्यांदा मोठ्या हिमतीने पुन्हा आपले शिवार फुलवण्याचा प्रयत्न केला. आर्थिक संकटासह इतर अनेक संकटांना तोंड देत रब्बी हंगामाची तयारी करणारे शेतकरी या अवकाळी पावसाने अाणखीनच संकटात सापडले आहेत.

वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी गुरुवारी सकाळी धुक्याच्या दुलईत लपेटलेली कैलास लेणी अनुभवली. वाढत्या थंडीतही पर्यटकांची गर्दी कायम असून लेण्यांचे

बेमोसमीपावसामुळे फर्दापूरच्या आठवडी बाजाराची चांगलीच फजिती झाली. आडोसा नसल्यामुळे विक्रेत्यांना भाजीपाला चिखलातच मांडावा लागला. पाऊस सुरू होताच सर्वत्र धावपळ सुरू झाली. काही क्षणांतच सर्वत्र चिखल झाल्यामुळे चिखलात बाजार की, बाजारात चिखल असा प्रश्न बाजारकरूंना पडला. बुधवारी झालेल्या रिमझिम पावसामुळे फर्दापूरच्या आठवडी बाजारात सर्वत्र चिखल झाला.
गावातील मुख्य रस्त्यावर हा आठवडी बाजार भरतो. या रस्त्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष असल्यामुळे विक्रेत्यांसह, नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यात अर्ध्यापर्यंत सिमेंटीकरण करण्यात आले आहे. ते पूर्ण झाले तर या अडचणी दूर होतील. फर्दापूर हे गाव जगप्रसिद्ध अजिंठा लेणीजवळ आहे. त्यामुळे राजे महाराजे यांच्या काळातील सराई पाहण्यासाठी देशी विदेशी पर्यटक गावात येतात; परंतु पावसामुळे सर्वत्र चिखल होतो. रस्त्यातील खड्ड्यात साचलेले पाणी आणि दुर्गंधीमुळे विदेशी पर्यटक बिचकतात. बुधवारी झालेल्या पावसानंतरही गावात हीच परिस्थिती होती.
पावसाने उडवली
एरवी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणारे शेतकरी दोन दिवसांपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे चिंताग्रस्त आहेत. अनपेक्षितपणे सुरू झालेला पाऊस, वातावरणातील बदल आिण सतत कमी किंवा वाढणाऱ्या थंडीमुळे ज्वारी, कापूस आदी पिकांवर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. दुसरीकडे पावसामुळे वाढणारा गारवा गव्हासाठी पोषक ठरेल, अशी आशाही शेतकऱ्यांना वाटत आहे.
दुष्काळी मदतीचे गुऱ्हाळ
१५डिसेंबर रोजी तालुक्यात दुष्काळ जाहीर होऊनही अद्याप शेतकऱ्यांना दुष्काळासंबंधी मदत मिळालेली नाही. या मदतीच्या चर्चेचे नुसते गुऱ्हाळ सुरू आहे. नापिकी कर्जाला कंटाळून तालुक्यातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. दुसरीकडे राज्य स्तरावर कर्जमाफी नको की हवी, यावर चर्चा घडवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे.