आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुहूर्त साधला, आता नियोजन करा; मराठवाड्यात रोहिण्या बरसल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या मराठवाड्याला रविवारी वरुणराजाने दिलासा दिला. बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. जालन्यातही हलक्या सरी कोसळल्या. लातूर नांदेड जिल्ह्याच्या काही भागांत रोहिण्या बरसल्या. वीज कोसळल्याने दोघांचा बळीही गेला. दरम्यान, जूनचा मुहूर्त साधल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यामुळे हवामानातील बदलानुसार आता नियोजन करा, असा सल्ला कृषितज्ज्ञांनी दिला आहे.
जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडाले
जालना|बदनापूरतालुक्यातीलहिवरा-राळा येथील जिल्हा परिषद शाळेचे पत्रे रविवारी वादळी वाऱ्याच्या तडाख्याने उडून गेले. तसेच या वादळात शाळेची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. सुदैवाने या वेळी शाळेच्या जवळपास कोणी नव्हते.
बीड जिल्ह्यात जोरदार सलामी
बीड - बीडसहगेवराई, परळी धारूरमध्ये जोरदार पाऊस झाला. बीड शहरात दीड तास पाऊस बरसल्याने रस्ते जलमय झाले. बीड तालुक्यात दराड्याचा वाडा येथे शेतकऱ्याचे पत्र्याचे शेड उडून गेले. दरम्यान, आैरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, वैजापूर, वेरूळ आणि लासूर स्टेशन परिसरात जोरदार पाऊस झाला.

बीड शहरात दुपारी तीन वाजता पावसाला सुरुवात झाली. मोरगाव दराड्याचा वाडा या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. दुपारी चार वाजता दराड्याचा वाडा येथे अशोक रंगनाथ दराडे यांचे पत्र्याचे शेड उडून गेले. धारूर तालुक्यात दुपारी तीन वाजता वादळी पावसामुळे गावंदरा येथे नवनाथ कारभारी बडे या शेतकऱ्याच्या बैलाचा मृत्यू झाला. दुपारी तीन वाजता गेवराईसह गढी, निपाणी जवळका, शिंदेवाडी, सिरसदेवी, रूई, रांजणीत जोरदार पाऊस झाला.

केसापुरी परभणी येथे पूर
वडवणीतालुक्यातील केसापुरी परभणी येथे मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला. या पुरात अडकलेल्या महिला ग्रामस्थांना गावातील तरुणांनी सुखरूप बाहेर काढले. महेश शिंदे, दादासाहेब शिंदे, पुरुषोत्तम शिंदे, योगेश खोकले, किरण बारवकर, गोकुळ बारवकर, गोविंद शिंदे, कृष्णा कुंडलकर हे तरुण मदतीला धावले.

वीजकोसळून चौघांचा मृत्यू
मराठवाड्यातविजा कोसळून चौघांचा मृत्यू झाला. माधव सटवा नामवाड (५५, रा. रावणकोळा शिवार, ता. जळकोट), अमोल अप्पाराव नागरगोजे (३०, रा. सोनवळा, ता. जळकोट, जि. लातूर), संजय आनंदा अंभाेरे (४५, रा. पिंपळदरी वाडा, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) आणि बाबुराव गुंडेराव बिरादार (६०, खत्नापूर, ता. देगलूर, जि. नांदेड) अशी नावे आहेत.