आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोकणासारखा पाऊस मराठवाड्यात कधी? तुरळक ठिकाणी सरी बरसल्याने पिकांना नवसंजीवनी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत मंगळवारी रिमझिम पाऊस बरसला. लातूर व नांदेड येथेही पावसाने चांगली हजेरी लावली.  जालना, हिंगाेली, परभणी, बीड, अाैरंगाबाद जिल्हा व उस्मानाबादकडे अद्यापही पावसाने पाठ फिरवली अाहे. तुरळक ठिकाणी सरी बरसल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली असली तरी काेकण व पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे मराठवाड्यात कधी पाऊस बरसेल, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची आस लागून आहे. 

लातुरात दुसऱ्या दिवशीही पाऊस
जिल्ह्यात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी चांगला पाऊस झाला.  रेणापूर, चाकूर, शिरूर अनंतपाळ, देवणी या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कायम होता. जिल्ह्यात मंगळवारी सकाळपर्यंत १२.१८ मिमी पाऊस झाला.

हिंगोली येथे रिमझिम पाऊस
हिंगोली जिल्ह्यात मंगळवारी तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना अंतर्गत मशागतीची कामे करण्यास उसंत मिळाली आहे.  वसमतला ११.१४ मि.मी पावसाची नाेंद झाली.  
 
अाैरंगाबादमध्ये  माेठ्या पावसाची अास
मराठवाड्यात पावसाला सुरूवात झाली असली तरी अद्यापही माेठा पाऊस झालेला नाही. सर्वाधिक कमी पावसाची नाेंद अाैरंगाबाद जिल्ह्यात झाली असून वैजापूर व कन्नड वगळता इतर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमीच अाहे. वैजापूरमध्ये ११.८० तर कन्नडमध्ये १०.८० मि.मी पाऊस नाेंदवला गेला. 

जालना जिल्ह्यात केवळ एक मि.मी. पाऊस
जालना जिल्ह्यावर पावसाची वक्रदृष्टी असून मंगळवारी जिल्ह्यात केवळ एक मि.मी पावसाची नाेंद झाली. अाठ तालुक्यांपैकी बदनापूर, भाेकरदन, जाफराबाद, अंबड हे तालुके काेरडेच असून, इतर चार तालुक्यांमध्येही केवळ रिमझिम सरी बरसत  अाहेत. 

परभणीत तीन मि.मी पाऊस
जालना पाठाेपाठ परभणीमध्येही केवळ तीन मि.मी पावसाची नाेंद झाली. परभणीकरांना अद्यापही माेठ्या पावसाची प्रतिक्षा अाहे. मंगळवारी जिंतूर वगळता इतर अाठ तालुक्यात कमी पाऊस झाला. जिंतूरमध्ये १० मि.मी पावसाची नाेंद झाली. 

नांदेडमध्ये पावसाचे अागमन
मंगळवारी जिल्ह्यात चांगली हजेरी लावली.  नांदेडमध्ये ८.९३ मि.मी. पावसाची नाेंद झाली. 
मुदखेड, नांदेड तालुका, बिलाेली, नायगाव, मुखेड, धर्माबाद तालुक्यांत शेतीला पाेषक पाऊस झाला. 

उस्मानाबादकडे पावसाची पाठ
उस्मानाबादेतील परंडा तालुका अद्यापही काेरडा असून, मंगळवारी जिल्ह्यात ३.९१ मि.मी पावसाची नाेंद झाली. उमरगा व तुळजापूर वगळता इतर तालुक्यांकडे पावसाने पाठ केली अाहे.

बीडमध्ये तीन तालुके काेरडेच
मंगळवारी झालेल्या पावसाने बीडकर काही प्रमाणात सुखावले . तरी अद्याप पाटाेदा, अाष्टी, शिरूर कासार या तालुक्यांकडे पावसाने पाठ केली अाहे.  
बातम्या आणखी आहेत...