आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्ये पाऊण तास मुसळधार, लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी, पाणीच पाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर जिल्‍ह्यात रस्‍त्‍यावर असे पाणी वाहिले. - Divya Marathi
लातूर जिल्‍ह्यात रस्‍त्‍यावर असे पाणी वाहिले.
औरंगाबाद - शहर व परिसरात रात्री साडेदहाच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. विजांच्या कडकडाटात सुरू झालेला हा पाऊस सुमारे पाऊण तास सुरू होता. रात्री उशिरापर्यंत रिमझिम सुरूच होती. दरम्यान, मराठवाड्यात गेवराई तालुक्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. तर, लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी येथे दोन तासांत ९० मिमी पावसाची नोंद झाली. िनलंगा तालुक्यात आतापर्यंत १७० मिमी पाऊस झाला आहे. तेरणा नदी १५ वर्षांत प्रथमच दुथडी भरून वाहिली. औरंगाबाद जिल्ह्यात गारज, चिंचोली व सिल्लोड परिसरात दुसऱ्या दिवशी पाऊस झाला. पैठण व खुलताबादेतही चांगला पाऊस झाला असून नागापूर परिसरात वीज पडून एक महिला जखमी झाली.
पुढे वाचा, गारज, चिंचोली, सिल्लोडमध्ये धो-धो... बघा पावसाचे फोटो... जागोजागी झाले पाणीच-पाणी... मराठवाड्याचे लोक सुखावले....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...