आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाची माहिती चोवीस तासांनंतरही यंत्रणेला नसते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्रगत तंत्रज्ञानाद्वारे हवामानाचे अंदाज व्यक्त होत असले तरी ग्रामीण भागात, दुर्गम ठिकाणी होणाऱ्या पावसाची माहिती २४ तासांनंतरही शासकीय यंत्रणेला मिळत नाही. दोन वर्षांपूर्वी जोरदार पावसामुळे डोंगरावरील तलाव फुटून माळीण गाव वाहून गेले होते. अनेकांचा मृत्यू झाला. त्या घटनेतून शासनाने कोणताही धडा घेतलेला नाही, असे ‘दिव्य मराठी’ने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. अतिशय साधे उपकरण वापरून ग्रामीण भागातून पावसाच्या तीन-चार तासांनी नोंदी मिळू शकतात. मोबाइलद्वारे या नोंदी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे आपण पाठवू शकताे. याकडेही दुर्लक्ष होत आहे.
तहसील कार्यालय स्तरावर पाऊस मोजण्याची पर्जन्यमापके असताना किमान तालुका पातळीवरची माहिती नियंत्रण कक्षाला मिळत नाही. जिल्ह्यातील सर्व ६५ मंडळांकडून नियंत्रण कक्षाला माहिती देणे शक्य नसले तरी किमान तहसील स्तरावर ही माहिती नियंत्रण कक्षाला कळवणे सहज शक्य आहे. त्यामुळे १२ तासांतली परिस्थिती काय आहे याची परिस्थितीही आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कळू शकते. मात्र, तहसील पातळीवरूनही माहिती नियंत्रण कक्षाकडे येत नसते. ग्रामीण पातळीवर मोठी घटना घडल्यास त्याची माहिती नियंत्रण कक्षाला कळवली जाते. तालुका पातळीवर घटना घडल्यास तहसीलदार नियोजन करतात. देशात सर्वत्र २४ तासांतला पाऊस मोजला जातो. त्यामुळे नियंत्रण कक्षाकडे येणाऱ्या पावसाची नोंदही २४ तासांचीच असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय चौधरी यांनी दिली.

जिल्ह्यात१६५ गावे पूररेषेत
औरंगाबाद जिल्ह्यात प्रामुख्याने गोदावरी, सुखना, दुधना, गिरिजा, लहुजी, फुलमस्ता, शिवना, पूर्णा, गडदगड, अंजना, येळगंगा या नद्या वाहतात. या नद्यांच्या काठी १६५ गावे आहेत. औरंगाबाद तालुक्यात १६, पैठण १८, फुलंब्री ०७, वैजापूर ३१, गंगापूर २६, खुलताबाद ०६, सिल्लोड १०, कन्नड ४८ आणि सोयगाव तालुक्यातील गावे पूररेषेत आहेत. प्रशासनाकडे १३ बोटी तसेच १७७ लाइफ जॅकेट, ६२ लाइफ बोटी आणि १८ सर्च लाइट उपलब्ध आहेत, असा दावा केला आहे.

गावांची नोंद नाही : जिल्ह्यातीलडोंगराखालच्या गावांची नोंद प्रशासनाकडे नाही.
^औरंगाबाद जिल्ह्यातकाळा पाषाण हा कडक दगड असल्यामुळे आपल्याकडे दरड कोसळण्याच्या घटना घडत नाहीत. मात्र, सातारा परिसरात काळजी घेण्याची गरज आहे. डोंगर पोखरण्याचे प्रकार सुरू असल्याने या परिसरात पायथ्याशी होणाऱ्या इमारतीच्या बांधकामांमुळे भविष्यात त्यांना धोका संभवू शकतो. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. -प्रा.अशोक तेजनकर, भूगर्भशास्त्र विभागप्रमुख, देवगिरी महाविद्यालय.

सातारा परिसरात काळजी घेणे गरजेचे
राजकीय पक्ष घेऊ शकतात पुढाकार

कोणत्याही गावात आपत्ती आली तर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मदतीला धावून जातात; पण औरंगाबाद जिल्ह्यातील नेमक्या कोणत्या गावांत धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते, त्या गावांत जाण्यासाठीचा मार्ग कोणता, तेथे सरकारी यंत्रणेची काय स्थिती आहे, याचा संशोधनपर अभ्यास झालेला नाही. तो करण्यासाठी राजकीय पक्ष दोन ते पाच लाखांचा निधी उपलब्ध करून देऊ शकले, तर एमफिल, पीएचडी करणारे विद्यार्थी उपयुक्त, मार्गदर्शनपर अहवाल देऊ शकतात.

^आपत्ती व्यवस्थापनाने किमान दिवसातून दोन वेळा तालुक्याचा आढावा घेणे गरजेचे आहे. त्यासाठी विभाग पातळीवर हवामान, पावसाच्या माहितीसाठी सी डॉपलर रडारदेखील बसवणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील हवामान-पावसाची माहिती आपत्ती व्यवस्थापनाने घेतली तरच संभाव्य धोके टाळता येऊ शकतात. -श्रीनिवास औंधकर, हवामानतज्ज्ञ

^मिनरल वॉटरबाटलीचा झाकणाकडील भाग कापून त्यावर मिलिमीटरच्या खुणा नोंदवून कोणत्याही गावात सोप्या पद्धतीने पाऊस मोजता येतो. दर तासाला पावसाची नोंद घेऊन मोबाइलवरून तो तहसील मुख्यालयाला दर तासाला पाठवणे शक्य आहे. गावातील पोलिस पाटील, सरपंच हे काम सहजपणे करू शकतात. -प्रा.डॉ. उमेश हंबिरे, पर्जन्यमापकाचे अभ्यासक
बातम्या आणखी आहेत...