आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जुन्या शहरात पावसाचा विक्रम, एक सप्टेंबरपर्यंत १०९ टक्के पाऊस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहर,जिल्ह्यात २२ ऑगस्टपासून अधूनमधून पाऊस पडत आहे. ११ दिवसांत जुन्या शहरात १९७ मिमी विक्रमी पाऊस पडला. एक सप्टेंबरपर्यंत येथे ५०९.६ ममिी पाऊस झाला असून सरासरी ओलांडली आहे. प्रत्यक्षात मात्र ४६५.२० मिमी पाऊस अपेक्षित असताना ९.६ टक्के अधिक पाऊस बरसल्याने सर्व जण सुखावले आहेत.

जिल्ह्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत ७०.८३ टक्के पाऊस पडला आहे. समाधानकारक पाऊस पडत असल्याने जायकवाडीत २५ टक्के, तर हर्सूल तलावातील पाण्याची पातळी ११.८ टक्क्यांवर पोहोचली आहे. जिल्ह्यात ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत समाधानकारक पाऊस झाला नाही. दुष्काळाचे सावट होते; पण २२ ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान मराठवाड्यात २० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला. स्थळनिहाय पडणाऱ्या पावसात फरक आहे.

स्थळ जून ते सप्टेंबर टक्केवारी पडलेला पाऊस
जुने औरंगाबाद ५१० मिमी. १०९.६
उस्मानपुरा ३१६ ६७
भावसिंगपुरा २८४ ६१.९
कांचनवाडी ३७७ ८१
हर्सूल २६६ ५७
चिकलठाणा २९० ६२.३
जायकवाडीच्या साठ्यात टक्के वाढ
३१जुलै रोजी जायकवाडीची जलपातळी १४९५.३१ फूट (१६.८४ टक्के) होती. एक सप्टेंबरला त्यामध्ये ९.१५ टक्क्यांनी वाढ होऊन ती १५०४.४६ फुटांवर (२५ टक्के) पोहोचली असून सोमवारी सायंकाळी वाजेपासून नांदूर-मधमेश्वर प्रकल्पातून १५,२४८ क्युसेक नागमठाण प्रकल्पातून ३६०० क्युसेक पाणी जायकवाडीच्या दिशेने येत आहे.