आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rain News In Marathi, Thunder Falling In Aurangabad, Divya Marathi

औरंगाबादमध्‍ये वादळी वा-यासह गारपीट!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औरंगाबादसह जिल्‍ह्यातील तुरळक ठिकाणी आज(बुधवार) वादळी वा-यासह गारपीट झाली. सायंकाळी पाच वाजेच्‍या सुमारास सुसाट्याच्‍या वा-यासह अकाली पावसाला सुरुवात झाली. साधारण 10 मिनीटे गारपीट सुरु होती. गारपीटमुळे शेतमालाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.

अवकाळी पावसामुळे परिसरातील गहू, हरबरा इत्‍यादी रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. शेतक-यांच्‍या हाताशी आलेल्‍या गव्‍हाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्‍याने शेतकरी राजा संकटात सापडला आहे. वादळी वा-यामुळे झाडे उन्‍मळून पडली आहेत. ग्रामीण भागात रस्‍त्‍यावर झाडे पडल्‍याने वाहतुकीमध्‍ये अडथळा निर्माण झाला आहे. अवकाळी पावसाच्‍या हजेरीमुळे हवेमध्‍ये गारवा आला आहे. वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे.

(फोटोओळी- गव्‍हाच्‍या पिकाचे असे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.)