आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘धूळ’धाण... तब्बल ५२ मिनिटे गुदमरला औरंगाबादचा श्वास!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सध्या उन्हाळ्याचे दिवस असले तरी भर पावसाळ्याचे वातावरण अनुभवायला मिळत आहे. शनिवारी दुपारी औरंगाबादेत सोसाट्याचा वारा आला. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट झाला. मग पावसाचा तडाखा बसला. शहरात आधीच झाडांची वानवा आणि त्यातच यंदा कमी पाऊस झाल्याने जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप झाली. परिणामी अख्खे शहर असे धुळीच्या लोटात बुडाले होते. छाया : माजेद खान

आरोग्यासाठी धोकादायक
औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाआधी उडणारे धुळीचे लोट सर्वांच्याच आरोग्यावर परिणाम करत आहेत. सामान्य व्यक्तीला यामुळे सर्दी,फ्लूपासून ते न्यूमोनियापर्यंतच्या श्वसनरोगांची लागण होऊ शकते. तर दम्याच्या रुग्णांना हा काळ जोखमीचा आहे. दम्याचा आजार यामुळे बळावतो. - डॉ. व्यंकटेश देशपांडे, श्वसनविकारतज्ज्ञ, डॉ. हेडगेवार रुग्णालय