आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्वेस्टिंग करून 1.75 कोटी लिटर पाणी मुरवणार - जिल्हा अधीक्षक कृषी अधिका-यांचा निर्धार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहानूरमियाँ दर्गा रोड येथे सात एकर जागेवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाची इमारत आहे. यावर रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेले नाही. या इमारतीवर लवकरच हार्वेस्टिंग करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

बीज परीक्षण प्रयोगशाळा यांच्या मालकीची ही जागा आहे. या जागेवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, बीज परीक्षण प्रयोगशाळा, आत्मा प्रकल्प कार्यालय, रामेती प्रशिक्षण केंद्र, कीड व रोग, फळबाग, उपसंचालक कृषी विभाग आदी कार्यालयांच्या इमारती आहेत. या इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग करून या पाण्याचा उपयोग गार्डन, लॉन, वृक्ष जतन आणि वापराच्या पाण्यासाठी करता येऊ शकतो.

पाणी वाहून जात नाही
सर्व कार्यालयांच्या छतावर पडणारे पाणी एका मोठ्या खड्ड्यात जमा होऊन जमिनीत मुरते. त्यामुळे विहीर आणि तीन बोअरवेलला बाराही महिने पाणी असते. आता रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यास आणखी मुबलक पाणी मिळेल. यासाठी प्रयत्न करू.
डी. डी. व्यवहारे, बीज परीक्षण अधिकारी

पाणी मुरवले जाईल
कृषी विभागाच्या संपूर्ण जमिनीवर पडणारे 80 टक्के पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग, उतारास आडवे चर, मोठा खड्डा आदी उपाययोजना केल्या जातील.
पंडित लोणार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी