आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरासह जिल्ह्यात दुष्काळाच्या चटक्यांवर पावसाचा शिडकावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहर व जिल्ह्यात सोमवारी रात्री अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मात्र, या अनाहूत पाहुण्यामुळे शहरातील 30 टक्के भागातील वीज गुल झाल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली.
जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन, गाजगाव, पोटूळ परिसरात रात्री नऊच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी विजेच्या कडकटासह तर काही ठिकाणी वादळी पाऊस पडला. अर्धा तास हा पाऊस सुरू होता. याच वेळी वेरूळ, म्हैसमाळ, दौलताबादसह खुलताबाद परिसरातही हलक्या सरी कोसळल्या. विद्युत फिडर ट्रीप झाल्याने मुकुंदवाडी, हर्सुल, टीव्ही सेंटर, शहागंज, निराला बाजार, क्रांती चौक, छावणी, बीड बायपास, गजानननगर आदी भागात रात्री अंधार पसरला होता.